Join us

तरुण-तरुणींच्या डोळ्यांतून पाणी काढणारा 'सैयारा' खरंच हिट झालाय का? कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:15 IST

'सैयारा' सिनेमा खरंच चांगला आहे का? या सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट वाचून जाणून घ्या

'सैयारा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाने अनपेक्षितपणे प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. 'सैयारा' पाहताना तरुण-तरुणींचे रडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एक तरुण तर चक्क सलाईन लावून थिएटरमध्ये आल्याचं चित्र दिसलं. त्यामुळे युवा वर्गातील 'सैयारा'ची क्रेझ पाहता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खरंच हिट झालाय का? हे बघणं कुतुहलाचं आहे. जाणून घ्या 'सैयारा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

'सैयारा' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

'सैयारा' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट बघण्याआधी सिनेमाच्या बजेटकडे लक्ष दिलं पाहिजे. या सिनेमाला हिट होण्याआधी बजेटच्या दुप्पट कमाई करणं आवश्यक आहे. 'सैयारा' हा सिनेमा तब्बल ३५-४० कोटींमध्ये बनवला गेला आहे. याशिवाय पोस्ट प्रॉडक्शन, संगीत, जाहिराती आणि प्रमोशनमुळे या सिनेमाचं एकूण बजेट ६० कोटी इतकं आहे. अशातच सैकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'सैयारा' सिनेमाने पाच दिवसात डबल कमाई केली आहे. म्हणजेच 'सैयारा' सिनेमाची एकूण कमाई १३२ कोटी इतकी झाली आहे.

'सैयारा' कमाईच्या बाबतीत सुपरहिट

'सैयारा' कमाईच्या बाबतीत सुपरहिट झालाय असं म्हणता येईल. 'सैयारा'  सिनेमाने पहिल्या दिवशी २१ कोटी, दुसऱ्या दिवशी २६ तर तिसऱ्या दिवशी ३५ कोटींचा व्यवसाय केला. चौथ्या दिवशी सिनेमाने २४ कोटींचा व्यवसाय करुन अवघ्या चार-पाच दिवसात 'सैयारा' सिनेमाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेतली. 'सैयारा' सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल सांगायचं झालं अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडेने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. अहानसोबत सिनेमात अभिनेत्री अनीत पड्डाने प्रमुख भूमिका साकारली आहे.

टॅग्स :अनन्या पांडेबॉलिवूडबॉक्स ऑफिस कलेक्शन