Join us

"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:47 IST

'सैयारा'मधून अहान पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्याच सिनेमाने अहानला प्रसिद्धी मिळवून दिली. पण, 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरीने अहानला छपरी म्हटलं आहे. 

सध्या जिकडेतिकडे एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे 'सैयारा'ची. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तरुणाईला या सिनेमाने वेड लावलं आहे. Gen Z मध्ये तर 'सैयारा'ची प्रचंड क्रेझ आहे. या सिनेमातून स्टारकिड असलेल्या अहान पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्याच सिनेमाने अहानला प्रसिद्धी मिळवून दिली. पण, 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरीने अहानला छपरी म्हटलं आहे. 

मोहित सुरीने अहान पांडेच्या कास्टिंगबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "मला आठवतंय शूटिंगचा ३०वा दिवस होता. तोपर्यंत ५० टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं. अहान क्रिएटिव्ह प्रोड्युसरला म्हणाला की मी ऑडिशनमध्ये असं काय केलं होतं? असं तर कोणतंच ऑडिशन मी दिलं नव्हतं. मला तर सांगितलं गेलं होतं की या भूमिकेसाठी तू एकदम परफेक्ट आहेस". 

"अहान पडद्यावर जसा दिसतो तसा तो अजिबातच नाहीये. त्याची दुसरी बाजूही आहे. तो एक उत्तम डान्सर आहे. त्याने सगळे व्हिडीओज डिलीट केले आहेत. हा मुलगा टिकटॉकर आहे. एकदम छपरी आहे", असंही मोहन सुरी म्हणाला. त्याच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, पहिल्या दिवसापासूनच 'सैयारा'ने बॉक्स ऑफिसवर कोटींमध्ये कमाई करायला सुरुवात केली होती. १३ दिवसात या सिनेमाने एकूण २७३ कोटींचा बिजनेस केला आहे. या सिनेमाचं बजेट ४५ कोटी इतकं होतं. अहानसोबत अनीत पड्डा 'सैयारा'मध्ये मुख्य भूमिकेत आहे.  

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी