Join us

ना प्रमोशन ना कोणता सुपरस्टार! तरीही बॉक्स ऑफिसवर 'सैयारा' धुवांधार; ३ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:49 IST

मोहित सूरीचं दिग्दर्शन असलेला 'सैयारा' सिनेमा शुक्रवारी(१८ जुलै) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचं ग्रँड प्रमोशनही करण्यात आलेलं नव्हतं. 'सैयारा'मध्ये मोठा सुपरस्टार किंवा ओळखीचा चेहराही नाही. तरीदेखील या सिनेमाने अवघ्या तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली आहे. 

सध्या 'सैयारा' या बॉलिवूड सिनेमाची जिकडे तिकडे चर्चा आहे. प्रदर्शित होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मोहित सूरीचं दिग्दर्शन असलेला 'सैयारा' सिनेमा शुक्रवारी(१८ जुलै) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचं ग्रँड प्रमोशनही करण्यात आलेलं नव्हतं. 'सैयारा'मध्ये मोठा सुपरस्टार किंवा ओळखीचा चेहराही नाही. तरीदेखील या सिनेमाने अवघ्या तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली आहे. 

'सैयारा' सिनेमात अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडे आणि अनीत पड्डा मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 'सैयारा'च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही जोरदार प्रतिसाद मिळाला होता. प्रदर्शनाच्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २१ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी २५ कोटींचा बिजनेस या सिनेमाने केला. रविवारी 'सैयारा'च्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली. या सिनेमाने तिसऱ्या दिवशी तब्बल ३७ कोटींची कमाई केली. आत्तापर्यंत 'सैयारा'ने ८३ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'सैयारा' सिनेमातून अहान पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमातील त्याच्या कामाचं कौतुकही होत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. सिनेमा रिलीज होण्याआधीच त्यातील गाणीही सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होती. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी