प्रसिद्ध भारतीय संगीतकार ए आर रहमान आणि सायरा बानो यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. 29 वर्षांनंतर संसारानंतर दोघे विभक्त होत आहोत. घटस्फोट झाल्यास ए आर रहमानला पत्नी सायराला पोटगी द्यावी लागेल. घटस्फोटानंतर पत्नीला मिळणारी आर्थिक भरपाई म्हणजे पोटगी अनेक घटकांवर अवलंबून आहे. ए आर रहमान घटस्फोटानंतर सायरा बानोला किती पोटगी देणार, हा मुध्दा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
ए.आर रेहमान आणि सायरा बानो हे मुस्लिम समाजातील असून पोटगीचे नियम वेगळे आहेत. न्यूज18 च्या रिपोर्टनुसार, इस्लाममध्ये विवाह हा एक करार आहे. या अंतर्गत हुंड्याची रक्कम निश्चित केली जाते. याबाबत एक औपचारिक कागद तयार केला जातो. ज्याला 'मेहर' असे म्हणतात. दोन्ही पक्ष त्या कागदावर स्वाक्षरी करतात. लग्न मोडल्यास किंवा घटस्फोट झाल्यास 'मेहर' ही रक्कम महिलेला दिली जाते. अशा परिस्थितीत एआर रहमानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सायराला 'मेहर'ची रक्कम मिळणार आहे. मात्र, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. 10 जुलै 2024 च्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की मुस्लिम महिला तिच्या पतीकडून भरणपोषण भत्ता घेण्यास पात्र आहे.
CrPC च्या कलम 125 च्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की पत्नी, मुले आणि अगदी पालकांसाठी भरणपोषण भत्ता ठरवण्याचा अधिकार दंडाधिकाऱ्यांना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. हा निर्णय म्हणजे मुस्लिम वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप असल्याचे टीकाकारांनी म्हटले आहे. जर हा निर्णय आधार मानला गेला तर सायराला ए आर रहमानकडून पोटगी मिळण्याची पात्रता आहे. आता तिने पोटगी मागितली तर किती रक्कम देण्यात येणार, हे दंडाधिकारी ठरवतील. न्यायदंडाधिकारी पतीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पोटगी ठरवतात. एआर रहमान यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती आहे. अशा परिस्थितीत सायरा चांगली रक्कम मिळू शकते.
दरम्यान, ए आर रेहमान आणि सायरा बानो यांनी 29 वर्ष एकत्र घालवली आहेत. दोघे तीन मुलांचे पालक आहेत. ए. आर. रेहमानचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांमध्ये समावेश होतो. GQ च्या रिपोर्टनुसार, एआर रहमानची एकूण संपत्ती 1,728 कोटी रुपये आहे. त्याच्या या संपत्तीमधून किती रक्कम पोटगी म्हणून सायरा बानोला देणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर सायरा बानोच्या वकिलाने सांगितले, "पोटगीवर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. रहमान आणि सायरा हे सहमतीने एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे सायरा पोटगीची कोणतीही रक्कम घेणार नाही".