Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायरा बानो रूग्णालयात, 3 दिवसांपासून आयसीयूमध्ये भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 13:46 IST

Saira Banu Admitted in ICU : दिलीप कुमार यांच्या निधनानं खचल्या सायरा, प्रकृतीवर होतोय परिणाम

ठळक मुद्दे1966 साली दिलीप आणि सायराबानू यांनी विवाह केला होता. तेव्हा त्या दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी  लहान होत्या.  

गेल्या 54 वर्षांपासून दिलीप कुमार यांच्यासोबत सावलीसारख्या राहणा-या सायरा बानो (Saira Banu )आताश: एकट्या पडल्या आहेत. दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या निधनानंतर सायरा बानो पूर्णपणे खचल्या आहेत आणि याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत असल्याचेही दिसतेय. गेल्या तीन दिवसांपासून सायरा बानो हिंदुजा रूग्णालयाच्या आयसीयूमध्ये भरती आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जातेय मात्र रक्तदाब सामान्य होत नाहीये.  त्यामुळे आणखी काही दिवस त्यांना रूग्णालयात राहावं लागणार आहे.

सायरा यांच्या जवळच्या लोकांच्या हवाल्याने दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा कोलमडल्या आहेत. त्या ना कोणाला भेटतं, ना कोणाशी बोलतं. याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला आहे. तीन दिवसांपूर्वी जेवणानंतर त्यांची प्रकृती बिघडली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सायरा बानो 76 वर्षांच्या आहेत. मात्र त्यांनी आपले वाढते वयाची कधीच पर्वा केली नाही. कारण त्यांना दिलीप साहेबांना सांभाळायचे होते. गेल्या काही वर्षांत दिलीप कुमार अंथरूणावर होते. सायरा यांनी त्यांची अगदी लहान मुलासारखी काळजी घेतली. त्यांना तळहातावरच्या फोडासारखं जपलं

मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है, असे सायरा बानो सतत म्हणायच्या. लोकांनी माझे कौतुक करावे, लोकांनी मला पतीव्रता म्हणावे, म्हणून मी दिलीप साहेबांची काळजी घेत नाही तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी त्यांची काळजी घेतेय. त्यासाठी मला कोणी बळजबरी केलेली नाही. मला कोणत्याही कौतुकाची अपेक्षा नाही. त्यांचा स्पर्श, त्यांचा सहवास हाच माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते आणि ते माझा श्वास आहेत, असे सायरा बानो एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. 1966 साली दिलीप आणि सायराबानू यांनी विवाह केला होता. तेव्हा त्या दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी  लहान होत्या.  

टॅग्स :सायरा बानूदिलीप कुमार