Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायना नेहवाल बायोपिकमध्ये श्रद्धा कपूरसोबत दिसणार हा बॅडमिंटनपटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 15:00 IST

सप्टेंबर महिन्यात सायना नेहवाल बायोपिकच्या चित्रीकरणाला श्रद्धाने सुरूवात केली आहे.

ठळक मुद्दे बॅडमिंटन प्लेयर ईशान नकवी दिसणार श्रद्धा कपूरसोबतईशान नकवी देतोय श्रद्धाला बॅडमिंटनचे ट्रेनिंग

खऱ्या आयुष्यात बॅडमिंटन प्लेयर व म्युझिशियन ईशान नकवीला सायना नेहवाल बायोपिकमध्ये श्रद्धा कपूरच्या अपोझिट भूमिकेसाठी साइन केले आहे. मजेशीर गोष्ट आहे की सप्टेंबर महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात झाली तेव्हा ईशान नकवी श्रद्धाला बॅडमिंटनचे ट्रेनिंग देत होता. काही दिवसांपूर्वी श्रद्धाने ईशान नकवीच्या ट्रेनिंगबद्दल सांगितले की, मी दररोज सकाळी सहा वाजता बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेते. माझे प्रशिक्षक ईशान नकवी खूप चांगले यंग कोच आहेत आणि त्यांच्याकडून मी खूप काही शिकत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक अमोल गुप्ते अशा नायकाच्या शोधात होते ज्याला बॅडमिंटन चांगले खेळता येत असेल. अशात त्यांना वाटले की एखाद्या अभिनेत्याला घेऊन त्याला बॅडमिंटनचे ट्रेनिंग देण्यापेक्षा ईशान नकवीलाच फायनल करूयात. श्रद्धा व ईशानने अमाल मलिकने संगीतबद्ध केलेल्या रोमँटिक गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे आणि या गाण्याची कोरियोग्राफी विजय गांगुली यांनी केली आहे.श्रद्धा कपूरला डेंग्यू झाल्यामुळे दरम्यानच्या काळात संपूर्ण टीम छोट्या ब्रेकवर गेली होती. या गाण्याचे चित्रीकरण आटोपल्यानंतर बाकी सीन्सच्या शूटिंगला सुरूवात केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

सायना नेहवाल बायोपिकसाठी श्रद्धा कपूरने महिनाभर खूप मेहनत करते आहे. याबाबत ती सांगते की, या बायोपिकसाठी मी बॅडमिंटनचे चाळीस क्लासेस अटेंड केले आहेत. स्पोर्ट्स खूप कठीण आहे, पण मी खूप एन्जॉय केले. खेळाडूंची जीवनशैली आकर्षक असते. सायनाचा जीवनप्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. या प्रवासादरम्यान तिला झालेल्या दुखापतीपासून तिने जिंकलेल्या किताबापर्यंतचा तिचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. मी तिच्या जीवन प्रवासाशी रिलेट करू शकले कारण मला माझ्या क्षेत्रात तसाच अनुभव आला आहे. ती तिच्या ध्येयाबाबत खूप फोकस आहे आणि तिचा जीवनप्रवास खूप प्रेरणादायी आहे. श्रद्धा पुढे म्हणाली की, 'सायना ही देशाची चाहती असून, एक विजेती आणि यूथ आयकॉन आहे. कोणत्याही कलाकारसाठी ही भूमिका चॅलेंजिंग आहे. मला आशा आहे की मी केलेली ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल.'

टॅग्स :सायना नेहवालश्रद्धा कपूर