Join us

Saif Ali Khan : सैफ अली खानवर ६ वेळा केला हल्ला; घरात काम करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:23 IST

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता पोलिसांनी त्याच्या घरात काम करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या ड्रायव्हर आणि इतरांना ताब्यात घेतले. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेलं जिथे त्यांची चौकशी केली जाईल. मोलकरणीवर आधी हल्ला झाला. मोलकरीण आणि हल्लेखोर यांच्यातील भांडणाचा आवाज ऐकून सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला, त्यानंतर हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला.

६ वेळा केला हल्ला 

सूत्रांनी दावा केला आहे की, सैफ अली खानवर धारदार शस्त्राने सहा वेळा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या मानेवर, डाव्या मनगटावर, छातीवर जखमा झाल्या. एवढंच नाही तर मणक्यालाही दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे ऑपरेशन आवश्यक असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन 

सैफ अली खानच्या घराचे आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहे. करीना कपूर आणि तिची मुलं सुरक्षित आहेत. मुंबई पोलिसांनी घटनेची पुष्टी केली त्यानंतर अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर सैफला उपचारासाठी लीलावती येथे नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आरोपीची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला जात आहे. वांद्रे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :सैफ अली खान मुंबई पोलीसगुन्हेगारी