Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमृताला घटस्फोट देण्यासाठी सैफने मोजले कोटयवधी रुपये; मुलांसाठीही दिले लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 14:59 IST

Saif ali khan: सैफसोबत घटस्फोट झाल्यानंतर अमृताने सारा अली खान आणि इब्राहिम या दोन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारली.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याचे सिनेमा जितके बॉक्स ऑफिसवर गाजतात. तितकीच त्याची पर्सनल लाइफ नेटकऱ्यांमध्ये चर्चिली जाते. आज सैफने करिना कपूरसोबत लग्न केलं असून त्यांना दोन मुलंदेखील आहेत. मात्र, आजही सैफच्या पहिल्या पत्नीची आणि त्याच्या नात्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगते. सध्या सोशल मीडियावर सैफ आणि त्याची पहिली पत्नी अभिनेत्री अमृता सिंह यांची चर्चा रंगली आहे. या दोघांनी २००४ मध्ये घटस्फोट घेतला. विशेष म्हणजे हा घटस्फोट झाल्यावर सैफने अमृताला मोठी रक्कम पोटगी म्हणून दिली होती. इतकंच नाही तर मुलांचा सांभाळ करण्यासाठीही तो मोठी रक्कम देत होता. म्हणूनच, अमृतासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफने किती पैसे खर्च केले जाणून घेऊयात.

सैफसोबत घटस्फोट झाल्यानंतर अमृताने सारा अली खान आणि इब्राहिम या दोन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे सैफ दर महिन्याला या मुलांच्या शिक्षणाचा वा अन्य खर्च यांसाठी ठराविक रक्कम अमृताला देत होता.

किती होती अमृताला दिलेल्या पोटगीची रक्कम?

सैफ आणि अमृताने १९९१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर जवळपास १३ वर्ष संसार केल्यानंतर ही जोडी विभक्त झाली. घटस्फोट घेतल्यानंतर सैफने अमृताला ५ कोटी रुपये पोटगी म्हणून दिले होते.  सुरुवातीला त्याने २.५ कोटी रुपये दिले. त्यानंतर हळूहळू करत त्याने उर्वरित रक्कम दिली. इतकंच नाही तर इब्राहिम १८ वर्षांचा होईपर्यंत सैफ दर महिन्याला अमृताला १ लाख रुपये देत होता.

टॅग्स :सैफ अली खान अमृता सिंगकरिना कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी