Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ek Din: सात दिवसांत फक्त ४ कोटी कमाई; डेब्यू सिनेमाच्या अपयशावर साई पल्लवीने सोडलं मौन, काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:56 IST

अखेर साई पल्लवीने एक दिन सिनेमाच्या अपयशावर सोडलं मौन, म्हणाली-" या भूमिकेसाठी..."

Sai Pallavi: आमिर खानच्या प्रॉडक्शनचा  ‘एक दिन’ हा चित्रपट अलिकडेच १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.  प्रेमकहाणीवर आधारित असलेल्या या चित्रपटात आमिर खानचा लेक जुनैद खान आणि अभिनेत्री साई पल्लवीची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या.  मात्र,  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाचं आतापर्यंतच बॉक्स ऑफिस कलेक्शन  पाहाता हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यास अपयशी ठरल्याचं दिसत आहे. अशातच अभिनेत्री साई पल्लवीने या चित्रपटाच्या अपयशावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

‘एक दिन’ या चित्रपटातून साई पल्लवीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.  मात्र, तिचा हा डेब्यू सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला.  अवघ्या ७ दिवसांत या सिनेमाने ४ कोटी इतकं कलेक्शन केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, साई पल्लवीने तिच्या 'एक दिन' या चित्रपटातील काम करण्याचा अनुभव शेअर करत इतर गोष्टींवरही प्रकाश टाकला.

आमिर खान टॉकिज या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "सिनेमातील काही सीन्स अगही सहजपणे करता आले असते, पण मी त्याबद्दल जरा जास्तच विचार करत होते. शिवाय मला वाटतं की या भूमिकेसाठी माझी निवड योग्य नव्हती. आमिर खान सरांशी बोलताना मी एकदा म्हटलं होतं,  ही भूमिका माझ्यासाठी बनलीच नव्हती आणि त्यासाठी माझं केलेलं कास्टिंगही योग्य नव्हतं. त्यांनी मला विचारलं, "तू असं का म्हणतेस? त्यावर मी त्यांनी म्हटलं, या भूमिकेसाठी एखादा नवीन चेहरा पाहिजे होता. जो थोडा खेळकर असेल. मला वाटतं हा चित्रपट दुसऱ्या कोणासाठी तरी बनला होता."असं साईने स्पष्टपणे सांगितलं. दरम्यान, मुलाखतीत जुनैद खानने साईच्या कामाचं भरभरून कौतुक केलं.

सुनील पांडे दिग्दर्शित 'एक दिन' या चित्रपटाची निर्मिती आमिर खान, मन्सूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. हा चित्रपट २०१६ च्या 'वन डे' या थाई रोमँटिक ड्रामाचा रिमेक आहे. 'एक दिन'नंतर, साई पल्लवी ४००० कोटींच्या 'रामायण' या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sai Pallavi Breaks Silence on 'Ek Din's Box Office Failure

Web Summary : Sai Pallavi addressed 'Ek Din's' poor box office performance, admitting she felt miscast. The film, starring Aamir Khan's son Junaid, garnered only ₹4 crore in its first week. Sai felt another actress may have been a better fit for the role.
टॅग्स :साई पल्लवीजुनैद खानबॉलिवूडसिनेमा