Join us

बुरका घालून स्वत:चा सिनेमा बघायला गेली साऊथची अभिनेत्री Sai Pallavi, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:53 IST

Sai Pallavi : साऊथ सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने यासाठी एक खास जुगाड केला. ती बुरका घालून तिचाच सिनेमा बघायला थिएटरमध्ये गेली.

सेलिब्रिटी बनल्यावर सेलिब्रिटी नॉर्मल जीवन फार मिस करतात. मग एखाद्या रेस्टॉरन्टमध्ये बसून बिनधास्त जेवण करणं असो वा थिएटरमध्ये लोकांसोबत सिनेमा बघणं असो. या गोष्टी सेलिब्रिटी लोकांना सहजपणे करणं शक्य नसतं. मात्र, साऊथ सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने (Sai Pallavi) यासाठी एक खास जुगाड केला. ती बुरका घालून तिचाच सिनेमा बघायला थिएटरमध्ये गेली.

साई पल्लवीचा बुरका घालून सिनेमा बघायला गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 'श्याम सिंघा रॉय' हा तिचा सिनेमा रिलीज झाला असून ती एरगड्डा हैद्राबादमधील श्री रामलू थिएटरमध्ये हा सिनेमा बघायला गेली होती. ती बुरका घालून रात्रीचा शो बघायला गेली होती. यावेळी तिच्यासोबत सिनेमाचा दिग्दर्शकही होता. 

३ तास सामान्य लोकांसोबत बसून तिने तिचा हा सिनेमा पाहिला. सोबतच लोकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत हेही बघितलं. आता बुरका घालून आहे म्हटल्यावर कुणालाच समजलं नाही की, त्यांच्या बाजूला सिनेमाची अभिनेत्रीच बसली आहे. तिला कुणीही ओळखू शकलं नाही. तिनेही सिनेमा संपेपर्यंत बुरका काढला नाही. सिनेमा संपल्यावर थिएटर बाहेर पडल्यावर तिने तिचा चेहरा दाखवला.  

टॅग्स :साई पल्लवीTollywood