मराठीतील दिग्गज अभिनेता सचिन पिळगावकर रणवीर सिंहचे चाहते आहेत. नुकतंच त्यांनी रणवीरचं भरभरुन कौतुक केलं. त्याचा कोणत्या सिनेमातील अभिनय सर्वात जास्त आवडला हेही सांगितलं. तसंच 'धुरंधर' सिनेमातील अभिनयाचंही त्यांनी कौतुक केलं. सचिन पिळगावकरांनी रणवीरच्या आणखी एका सिनेमाचं नाव मात्र आवर्जुन घेतलं. कोणता आहे तो सिनेमा?
वैभव मुंजालला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले, "रणवीर सिंहचा '८३' सिनेमातला अभिनय मला खूप आवडला होता. मला तो अभिनेता म्हणून खूप आवडतो. कारण तो त्या भूमिकेत अक्षरश: घुसतो. असे कलाकार मला खूप आवडतात. 'धुरंधर' मध्येही मला त्याचं काम खूप आवडलं होतं. भले सिनेमात अक्षय खन्नाचं काम सगळ्यांना आवडलं. त्यानेही चांगलंही केलं होतं. पण रणवीरच्या भूमिकेला मर्यादा होत्या. त्याला स्वत:ची स्पाय ही ओळख लपवायची होती. स्वत:वर नियंत्रण ठेवणं, स्वत:ला थांबवणं हे जे त्याने केलं ते अद्भूत आहे."
सचिन पिळगावकरांना 'एकापेक्षा एक'शो यायचा. यामध्ये ज्यांचा परफॉर्मन्स आवडला त्यांना सचिन पिळगावकर १०० रुपयाचं बक्षीस द्यायचे. रणवीर सिंह भेटेल तेव्हा त्याला बक्षीस नक्की देईन असंही ते यावेळी म्हणाले.
सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि गायक अशा तिन्ही भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी 'अशी ही बनवाबनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'गंमत जंमत', 'नादिया के पार', 'बालिका वधू', 'अखियो के झारोंखो से', 'शोले' यांसारख्या गाजलेल्या मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
Web Summary : Veteran actor Sachin Pilgaonkar admires Ranveer Singh's acting, especially in '83'. He praised Singh's dedication to roles and lauded his performance in 'Dhurandhar', despite Akshay Khanna's acclaim. Pilgaonkar expressed his desire to award Singh for his talent.
Web Summary : दिग्गज अभिनेता सचिन पिलगांवकर रणवीर सिंह की एक्टिंग के प्रशंसक हैं, खासकर '83' में। उन्होंने भूमिकाओं के प्रति सिंह के समर्पण की सराहना की और अक्षय खन्ना की प्रशंसा के बावजूद 'धुरंधर' में उनके प्रदर्शन की सराहना की। पिलगांवकर ने सिंह को उनकी प्रतिभा के लिए पुरस्कृत करने की इच्छा व्यक्त की।