Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शेट्टीच्या पोलिस फोर्समध्ये खान त्रिकुटाची एन्ट्री? दिग्दर्शकाने सांगितला फ्युचर प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 12:37 IST

रोहित शेट्टीची पोलिस फोर्स वाढतच जात आहे.

बॉलिवूडमध्ये रोहित शेट्टी (Rohit Shetty) असा दिग्दर्शक आहे ज्याने स्वत:ची एक पोलिस फोर्सच तयार केली आहे. अजय देवगणच्या  'सिंघम' पासून खरं तर याची सुरुवात झाली. नंतर रणवीर सिंहचा 'सिंबा' आणि अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' आला. आता 'सिंघम अगेन' मध्ये हे तिघंही एकत्र येत आहेत शिवाय टायगर श्रॉफचीही एन्ट्री झाली आहे. रोहित शेट्टीच्या या कॉप युनिव्हर्समध्ये भविष्यात आणखी कोण अभिनेते येणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. रोहितने नुकताच याबाबतीत त्याचा प्लॅन सांगितला आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'इंडियन पोलिस फोर्स' ही सीरिज नुकतीच अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत आहेत. सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटवेळी रोहितला एका चाहत्याने विचारले,'भविष्यात तीनही खानपैकी कोणत्या खानला तुमच्या पोलिस फोर्समध्ये घ्याल?' यावर रोहित म्हणाला,'मी तिघांना घेईन. एकालाही का सोडू? आरामात..खूप वेळ आहे. अजून तर पूर्ण इंडस्ट्रीला पोलिस बनवायचं आहे. तू टेन्शन घेऊन नकोस. कोणालाच नाही सोडणार! आमचं एक वेगळं पोलिस फंक्शन असेल ज्यामध्ये तीनही खान असतील.'

रोहितचं फ्युचर प्लॅनिंग बघता हे त्याची पोलिस फोर्स वाढतच जाणार आहे. या फोर्समध्ये शिल्पा शेट्टीपासून लेडी पोलिसचीही एन्ट्री झाली आहे. तर करीना कपूर खान आणि दीपिका पदुकोण आधीच सिंघम अगेनचा भाग आहेत. रोहित शेट्टी या सर्वांना घेऊन आपली वेगळी पोलिस फोर्स बनवणार असल्याने प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन होणार आहे. तसंच पुढच्या दोन वर्षात 'गोलमाल 5' ही घेऊन येईन असं रोहित म्हणाला आहे. 

टॅग्स :रोहित शेट्टीसलमान खानआमिर खानशाहरुख खानपोलिस