'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025'च्या अंतिम सामन्यात क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबत स्पॉट झाल्यापासून Rj Mahvash चर्चेत आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये एकत्र दिसल्यापासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आता Rj Mahvash हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी आता व्हायरल होत आहे.
नुकतंच Rj Mahvash हिला 'बेस्ट मेगा इन्फ्लुएंसर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावर तिनं आनंद व्यक्त पोस्ट शेअर केली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "ब्रँड प्रमोशनसाठी २००० रुपयांपासून सुरुवात तर आज चित्रपट निर्माता बनण्यापर्यंतचा हा प्रवास. मी हे सर्व पाहिलं आहे. विश्वास ठेवा, एका छोट्या शहरातून आल्यामुळे मॅकडोनाल्डला जाणं हिचं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मला मेट्रो शहर फिरण्याची खूप इच्छा होती. मग एका नवीन शहरात एकटी आले, स्वतःहून सर्वकाही साध्य केलं, स्वतःच्या बळावर काहीतरी करायला खूप मजा येते. मी जितकं मिळवलं आहे, तितके मोठे स्वप्नही मी कधीच पाहिले नव्हते. हा माझा पहिला पुरस्कार नाही, पण प्रत्येक लहान कामगिरी मला खास वाटते".
हीच पोस्ट इन्स्टावर शेअर करत तिनं लिहलं, "छोटी माहवशला आज या माहवशचा अभिमान आहे आणि हेच सर्वात महत्त्वाचे आहे! आपण फक्त आपलं काम करत राहायचं. चुकीचे करायचं नाही आणि चुकीचं ऐकून घ्यायचं नाही". तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.