Join us

वहिनीच्या त्या निर्णयावर रितेश देशमुख झाला खूप खूश, म्हणाला - 'हे तर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 19:25 IST

Riteish Deshmukh : रितेश देशमुखसाठी वहिनीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. जी पाहून अभिनेता भारावून गेला.

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखच्या वेड चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाचा ‘वेड’वर कोणताही परिणाम झाला नाही. अजूनही वेड चित्रपट थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षक पाहत आहेत. आता रितेशने त्याच्या चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. वेड सिनेमा फक्त ९९ रुपयांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने रितेश आणि जिनिलीयाने त्यांच्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. सगळ्याच चित्रपटगृहांमध्ये वेड फक्त आता ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे. त्यांच्या या निर्णयाचा अजूनच चित्रपटाला फायदा मिळणार आहे. शिवाय रितेशची वहिनी म्हणजेच त्याचा भाऊ अमित देशमुख यांची पत्नी अदिती देशमुख यांनी एक निर्णय घेतला आहे. लेक अवानला घेऊन ‘वेड’ चित्रपट पुन्हा पाहण्याचा निर्णय अदिती देशमुख यांनी निर्णय घेतला आहे. अदिती यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यांची ही पोस्ट पाहून रितेशही इंप्रेस झाला आहे. त्याने अदिती यांची ही पोस्ट पुन्हा शेअर केली आहे.

रितेशने या पोस्टमध्ये म्हटले की,, माझं अवानवर प्रेम आहे. हे खूपच छान आहे वहिनी. वहिनी पुन्हा चित्रपट पाहणार हे कळताच रितेशने त्यांची प्रशंसा केली. शिवाय रितेशने ‘वेड’च्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनबाबतही पोस्ट शेअर केली आहे. ४५ दिवसांमध्ये या चित्रपटाने ७३ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखवेड चित्रपट