Join us

आधी रितेशने 'वेड' लावलं अन् त्यालाच आता पठाणचं वेड लागलं ! म्हणाला, 'खूप वाट पाहावी लागली...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 15:23 IST

केवळ चाहतेच नाही तर बॉलिवुड सेलिब्रिटीही पठाण बघण्यासाठी उत्सुक आहेत.

Riteish Deshmukh On Pathaan : आज सगळीकडेच किंग खानच्या पठाणची चर्चा आहे. पठाण (Pathaan) सिनेमाने चाहत्यांना भुरळच घातली आहे. केवळ चाहतेच नाही तर बॉलिवुड सेलिब्रिटीही पठाण बघण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातही अॅक्शन भूमिकेत असणाऱ्या शाहरुख खानचं कौतुक होत आहे. अभिनेता रितेश देशमुखनेही किंग खानचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेशने ट्वीट करत पठाण पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. तो म्हणतो, 'वादळ येत आहे. सीटबेल्ट घट्ट बांधा. खूप प्रतिक्षा करावी लागली तिकीटं आधीच बुक केली आहेत. खूप खूप शुभेच्छा शाहरुख.'

Shahrukh Khan Salman Khan : पठाण मध्ये झाली 'टायगर'ची एंट्री, टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आवाजात चाहत्यांचा जल्लोष

एकीकडे बॉक्सऑफिसवर रितेशच्या वेड सिनेमाने धुमाकूळ घातला होता. आता पठाण मधून शाहरुखने कमबॅक केलं आहे. चित्रपटसृष्टी हळूहळू सावरताना दिसत आहे.पठाण मुळे आता वेड ची घौडदौड कदाचित थांबण्याची शक्यता आहे. मात्र एकंदरच नवीन येणारे हिंदी असो मराठी चित्रपट असो चांगली कमाई करत आहेत.

टॅग्स :रितेश देशमुखपठाण सिनेमाशाहरुख खानट्विटर