Join us

अक्षय कुमार-फरदीनसोबत रितेश देशमुख 'हे बेबी'च्या गाण्यावर धमाल नाचला, व्हिडीओ पाहून चाहते आनंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 14:21 IST

अक्षय कुमार-फरदीन खान-रितेश देशमुख या त्रिकूटाने पुन्हा एकदा त्यांच्या गाजलेल्या गाण्यावर धमाल डान्स केलाय (riteish deshmukh, akshay kumar)

२००७ साली आलेला 'हे बेबी' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. या सिनेमाचं हटके कथानक आणि तुफान विनोदांमुळे 'हे बेबी' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सिनेमातील अक्षय कुमार-फरदीन खान-रितेश देशमुख या तिघांच्या जोडीलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता १७ वर्षांनी याच त्रिकूटाने 'हे बेबी' गाण्यावर धमाल डान्स केलाय. याशिवाय अक्षय-फरदीनच्या आगामी 'खेल खेल में' सिनेमातील 'हौली होली' गाण्यावर रितेश देशमुख दोघांसोबत नाचलाय.

१७ वर्षांनी 'हे बेबी' त्रिकूट आलं एकत्र

अक्षय कुमार-फरदीन खान-रितेश देशमुख यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला.  यात तिघंही त्यांच्याच गाजलेल्या 'हे बेबी' सिनेमातील टायटल सॉंगवर डान्स करत आहेत. विशेष म्हणजे या गाण्यावर डान्स करतानाच रितेश त्या दोघांना 'हौली होली' गाण्यावर डान्सची साथ देतो. फरदीन-अक्षयच्या आगामी 'खेल खेल में' सिनेमातील या गाण्यावर रितेशही थिरकला आहे. विशेष म्हणजे 'हे बेबी' सिनेमातील गाण्याची एक स्टेप 'हौली हौली' गाण्यात वापरली आहे. त्यामुळे १७ वर्षांनी अक्षय-रितेश-फरदीन या त्रिकूटाला पाहून चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. 

 

अक्षय -फरदीनच्या खेल खेल में सिनेमाची उत्सुकता

'खेल खेल में' सिनेमात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्यासोबत वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खान, अॅमी वर्क, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल या कलाकारांच्या प्रमूख भूमिका आहेत. 'खेल खेल में' सिनेमा या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार आहे. रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचं सूत्रसंचालन करत आहे.

टॅग्स :अक्षय कुमाररितेश देशमुखफरदीन खान