Join us

'ते मला रोज रडवायचे'; नीतू कपूर यांनी सांगितल्या वैवाहिक जीवनातील आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 14:03 IST

Rishi kapoor birthday special :बऱ्याचदा सोशल मीडियावर ऋषी कपूर व त्यांची पत्नी नीतू कपूर यांची चर्चा होत असते.

ठळक मुद्देनीतू कपूर सोशल मीडियावर ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा देत असतात.

बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन होऊन बराच काळ लोटला. मात्र, आजही चाहते त्यांच्या आठवणींमध्ये रमून जातात. विशेष म्हणजे बऱ्याचदा सोशल मीडियावर ऋषी कपूर व त्यांची पत्नी नीतू कपूर यांची चर्चा होत असते. सध्या चाहत्यांमध्ये या जोडीची अशीच एक चर्चा रंगली आहे. ऋषी कपूर यांच्या 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रामध्ये नीतू कपूर यांनी त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. त्यातलाच एक किस्सा सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चिला जात आहे.

'बॉबी' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या ऋषी कपूर यांनी १९८० मध्ये नीतू सिंग यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून या जोडी कायम एकमेकांची साथ दिली. विशेष म्हणजे या दोघांच्या नात्यात अनेक चढउतार आले. मात्र, त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. त्यामुळेच अनेकदा नीतू कपूर सोशल मीडियावर ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा देत असतात. यामध्येच ''ऋषी कपूर मला इतके त्रास द्यायचे की मी अक्षरश: रडायचे", असं नीतू कपूर यांनी म्हटलं आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर या दोघांची चर्चा रंगली आहे.

"त्याकाळी मी ऋषी कपूर यांना चांगलं ओळखत होते. त्यामुळे त्यांच्यासोबत एकत्र राहून संसार करण्याची माझी फार इच्छा होती. पण, त्यावेळी शहरातील सगळ्यात जास्त त्रासदायक ठरणारा बॉयफ्रेंडदेखील तेच आहेत हे सुद्धा मला माहित होतं, असं नीतू कपूर म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "ते मला रोज रडवायचे पण तरीदेखील मला त्यांच्याच सोबत रहायचं होतं. त्यांना असं सहजासहजी ओळखणं शक्य नाही हे मात्र तितकंच खरं आहे. पण एक गोष्ट मी ठामपणे सांगू शकते की, त्यांच्यासारखा चांगला आणि उत्तम व्यक्ती सापडणं शक्य नाही."

दरम्यान, ऋषी कपूर यांच्या बायोग्राफीमध्ये रणबीर कपूरनेदेखील आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

टॅग्स :नितू सिंगबॉलिवूडसेलिब्रिटी