Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्याच लग्नात दारूच्या नशेत होते ऋषी आणि नीतू कपूर, अभिनेत्रीनेच केलेला खुलासा, म्हणाल्या, “मी सप्तपदी घेताना...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 13:07 IST

Rishi Kapoor Birthday : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आज जयंती आहे.

आपल्या अभिनयाने ७०-८०चं दशक गाजवणारे आणि तेव्हाच्या काळात अनेक मुलींच्या मनावर राज्य करणारे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा आज जयंती आहे. १९७३ साली बॉबी या चित्रपटातून पदार्पण केलेल्या ऋषी कपूर यांनी अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले. त्यांनी १९८० साली प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर यांच्याशी विवाह केला होता. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. स्वत:च्याच लग्नात ऋषी कपूर आणि नीतू कपूर दारू प्यायले होते. खुद्द नीतू कपूर यांनीच याचा खुलासा केला होता.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. त्यांच्या लग्नाचा शाही सोहळा पाहण्यासाठी तब्बल ५ हजार लोकांनी हजेरी लावली होती. नीतू कपूर यांनी जुग जुग जियो या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या, “आमच्या लग्नात जवळपास ५ हजार लोक उपस्थित होते. एवढ्या पाहुण्यांच्या गर्दीमुळे ऋषी कपूर यांनी अस्वस्थ वाटू लागलं होतं. ते लग्नात दोन वेळा बेशुद्धही झाले होते. लग्नात घोड्यावर चढण्याच्या आधीही ते बेशुद्ध झाले होते. लग्नातील गर्दी पाहून ते घाबरले होते. त्यामुळे ते ब्रँडी पित होते.”

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात गश्मीर महाजनी एन्ट्री घेणार? खुलासा करत म्हणाला, “मी तीन वेळा...”

शाहरुख खानच्या ‘जवान’मधील ‘त्या’ डायलॉगवरुन वाद, पोलिसांत तक्रार दाखल

“असं होतं आमचं लग्न. त्यांच्याबरोबर मीदेखील दारू पित होते. सप्तपदी घेताना मी नशेत होते,” असा खुलासा नीतू कपूर यांनी केला होता. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नात पाकिटमारीही झाली होती. २०२० साली ऋषी कपूर यांचं निधन झालं. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी रणबीर आणि रिधिमा ही दोन मुले आहेत. रणबीर कपूरहीबॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

टॅग्स :ऋषी कपूरनितू सिंगरणबीर कपूरबॉलिवूड