Join us
Daily Top 2Weekly Top 5

चार लग्न करुनही ऋषी कपूरच्या अभिनेत्रीला मिळालं नाही खरं प्रेम, अदनान सामीसोबत देखील होती नात्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 11:07 IST

अभिनेत्रीनं तिसरं लग्न गायक अदनान सामीसोबत केलं होतं. दोघांना अजान सामी खान नावाचा मुलगा आहे.

Zeba Bakhtiar Mariages: साल 1991मध्ये आलेल्या हिना चित्रपटनं जेबा बख्तियारने आपल्या सौंदर्यानं सगळ्यांना घायाळ केलं होतं. या चित्रपटानंतर लोक जेबा बख्तियारला 'हिना' नावाने हाक मारायला लागले. या चित्रपटात तिच्यासोबत ऋषी कपूर आणि अश्विनी भावे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातून जेबा रातोरात स्टार झाली. मात्र, अभिनेत्रीचे करिअर बॉलिवूडमध्ये फार काळ तग धरू शकले नाही आणि ती पुन्हा पाकिस्तानला गेली. जेबा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होती.

जेबा बख्तियारने केली चार लग्नजेबा बख्तियार(Zeba Bakhtiar) पाकिस्तानातील एका मोठ्या कुटुंबातून येते. ती पाकिस्तानातील प्रसिद्ध वकील आणि राजकारणी याह्या बख्तियार यांची मुलगी आहे. जेबाचे वडील पाकिस्तानी आणि आई ब्रिटीश आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेबा बख्तियारने एकूण चार विवाह केले आहेत. या चार विवाहांपैकी तिचे 2 पती भारतीय आहेत. जेबाने पहिले सलमान वलियानीशी लग्न केले. यानंतर अभिनेत्रीचे दुसरे लग्न भारतीय अभिनेता जावेद जाफरीसोबत झाले. जावेदला घटस्फोट दिल्यानंतर जेबाने गायक अदनान सामीसोबत लग्न केले. अदनान सामीनंतर तिनं सोहेल खान लेघारीशी लग्न केलं. जेबा बख्तियारला अदनान सामी यांचा मुलगा देखील आहे ज्याचे नाव अजान सामी खान आहे.

बॉलिवूडमध्ये नाही मिळालं यश विशेष म्हणजे 'हिना' चित्रपटात हिनाची भूमिका साकारून जेबा खूप लोकप्रिय झाली होती. यानंतर ती इतर काही चित्रपटांमध्येही दिसली, मात्र बॉलिवूडमध्ये तिला यश मिळू शकले नाही. जेबाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती मोहब्बत की आरजू, स्टंटमॅन, जय विक्रांत, सरगम, सू आणि चीफ साहेब यासारख्या काही चित्रपटांमध्ये दिसली आहे. जेबा सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली राहते.

टॅग्स :ऋषी कपूरबॉलिवूडअदनान सामी