Join us

रिचा चड्ढा ने स्मिता पाटिल यांना वाहिली श्रद्धांजली, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 14:57 IST

रिचाने स्मिता पाटील यांच्या लूकसारखा मेकअप केला आहे.

रुपेरी पडद्यावर बायोपिकचा ट्रेंड चांगलाच सुपरहिट ठरला आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरील सिनेमा रसिकांना विशेष भावला आहे.लवकरच आता आणखीन एक बायोपिक रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. नुकतेच सोशल मीडियावर रिचा चढ्ढाने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने स्मिता पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बेंगलुरुच्या फोटोग्राफरने रिचाचे हे फोटोशूट केले आहे. रिचाने स्मिता पाटील यांच्या लूकसारखा मेकअप केला आहे. रिचाने शेअर केलेला फोटोमुळे ती स्मिता पाटील यांची भूमिका रूपेरी पडद्यावर साकारणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर मात्र रिचाने अजून आपले मत मांडले नसले तरी ती स्मिता पाटील यांच्या भूमिकेत झळकल्याची शक्यता असल्याचे समजते.

तसेच रिचा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार 'शकीला'च्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार  आहे. यासाठी ती खूप मेहनत घेतल आहे. शायना लेबना यांच्या मार्गदर्शनखाली रिचा बेली डान्ससाठीचे धडे गिरवत आहे. या बायोपिकचे चित्रीकरण  सुरू आहे. नव्वदच्या दशकावर आधारित हा सिनेमा आहे कारण शकिला यांचा स्टारडम त्यावेळी जास्त होते. यावर रिचाने म्हटले की, मी या सिनेमाला घेऊन खूप उत्सुक आहे. सिनेमा थोडाफार कॉन्ट्रोव्हर्शल देखील असणार आहे कारण शकिला यांचे व्यक्तिमत्त्व तसे आहे. मी त्यांची जाऊन भेट देखील घेतली त्या फारच बिनधास्त आहेत. आता रिचा चड्ढाला शकीलाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

टॅग्स :रिचा चड्डास्मिता पाटील