Join us

Rhea Kapoor Wedding: सोनम कपूरची छोटी बहीण रिया आज अडकणार लग्नबेडीत, जाणून घ्या कोणासोबत घेणार आहे सात फेरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 17:26 IST

अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर आज लग्नबेडीत अडकणार आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर आज लग्नबेडीत अडकणार आहेत. रिया आपल्या ब्रॉयफ्रेंड करण बूलानीसोबत विवाह करणार असल्याची माहिती समोर येत आहे. करण आणि रिया यांचा विवाह जुहूमधील बंगल्यात होणार आहे. तसेच या लग्न सोहळ्यात जवळील नातेवाईंकांना आणि मित्रमंडळींना निमत्रंण देण्यात आले आहे. रिया आणि करण यांनी त्यांचा विवाह अगदी काही लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पण याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा अधिकृतपणे खुलासा देखील करण्यात आला नाही. 

रिया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती नेहमीच करण सोबत अनेक रोमँटिक फोटो पोस्ट करताना दिसते. करण एक फिल्ममेकर असून त्याने आजतागयत ५०० जाहिराती तयार केल्या आहेत. आयशा आणि वेक अप सिड सारख्या चित्रपटात करण बूलानीने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. इतकेच नाही तर अनिल कपूर सोबत सिलेक्शन डे या सिनेमात करणने काम केले आहे आणि लघुपटदेखील तयार केली आहे.

तसेच रिया कपूरच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाले तर रियाने आयशा आणि वीरे दी वेडिंग सारख्या चित्रपटाची निर्मीती केली आहे. रिया आणि सोनम कपूर यांनी एकत्र येऊन Rheson नामक फॉशन ब्रॅण्ड स्थापित केला आहे.

आपल्या लहान बहिणीच्या लग्नासाठी गेल्या महिन्यातच सोनम कपूर मुंबईत दाखल झाली आहे आणि सोनमचा पती आनंद आहूजा देखील आता मुंबईत पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूर