Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतच्या सिनेमाची सायनिंग अमाउंट १५ कोटीचं गुपित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 17:00 IST

दिग्दर्शक जाफरी म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीचा हा सिनेमा वासु भगनानी प्रोड्युस करणार होते.

रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतला एका सिनेमासाठी मिळणाऱ्या १५ कोटी रूपयांच्या रक्कमेबाबत दिग्दर्शक रूमी जाफरी सर्वातआधी एका न्यूज चॅनलसोबत बोलले होते. त्यांनीच सुशांत आणि रियाच्या या सिनेमाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

रिया-सुशांतचा सिनेमा

दिग्दर्शक जाफरी म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीचा हा सिनेमा वासु भगनानी प्रोड्युस करणार होते. या सिनेमासाठी सुशांत फारच उत्साहित होता. या सिनेमाच्या निमित्ताने सुशांतसोबत गेल्या वर्षापासून बोलणं सुरू होतं. यासाठी तो अनेकदा माझ्या घरीही येत होता.

ते म्हणाले होते की, रिया आणि सुशांतच्या या सिनेमाची कथा नॉर्थ इंडियात घडत होती. त्यामुळे आमही अनेक लोकेशन्सही सीलेक्ट केले होते. पण अचानक लॉकडाऊन झालं आणि सगळं काम जागेवरच थांबलं.

सर्वातआधी आम्ही सुशांत आणि रियासोबत या सिनेमासाठी एक गाणं शूट करण्याचा प्लॅन केला होता. कारण सुशांत एक फार डान्सर  होता. त्याला अनेक रिअॅलिटी शोजचा अनुभवही होता. त्यामुळे आम्ही गाणं शूट करण्याचा निर्णय घेतला होता. हे गाणं दुसरीकडे कुठे नाही तर आम्ही मंबईत शूट करणार होतो.

'सुशांत डिप्रेशनमध्ये होता, सुरू होता उपचार'

जाफरी म्हणाले की, मला एक समजत नाही की, व्यक्ती डिप्रेशनमध्ये इतकं मोठं पाऊल उचलू शकतो. सुशांत पाच किंवा सहा महिन्यांआधी डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची बाब मला माहीत होती. मधे तो बरा झाला होता तर आनंदीही होता आणि आमच्यासोबत सिनेमा करत असल्याने उत्साही होता. सिनेमाबाबत आमच्यात अनेक गोष्टीही झाल्या. तो फार हुशार आणि हसमुख मुलगा होता. आता त्याने जे केलं त्याचं काय कारण होतं हे तर तपासातून समोर येईलच. पण सुशांतबाबत वयक्तिक पातळीवर वाईट वाटतं. असं वाटतं आपलं कुणीतरी गेलंय.

हे पण वाचा :

रियाला मुलाखतीवरून शेखर सुमन यांचा टोला, म्हणाले- माझ्याही स्वप्नात आला सुशांत आणि ...

सुशांतचे वडिलांशी चांगले संबंध नव्हते, मला भेटण्यापूर्वी पाच वर्षे त्यांना तो भेटलाच नाही, रियाचा दावा

सुशांतच्या बाळाची आई होण्याबाबत पहिल्यांदाच रियाने केला खुलासा, एकमेकांना दिलं होतं वचन!

सुशांतसोबत राहून मी पण डिप्रेशनमध्ये गेले असते, म्हणून मी.....

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीबॉलिवूड