Join us

रेमोची पत्नी लिजेलने सांगितले, हार्ट अटॅकनंतर कशी आहे त्याची तब्येत....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 13:12 IST

आमीरने मुंबई मिररसोबत बोलताना सांगितले की, रेमोची तब्येत आता ठीक आहे. तर रेमोची पत्नी लिजेल डिसुजानेही सांगितले की, तो आता बरा आहे.

कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुजाला शुक्रवारी हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रेमोला बघण्यासाठी धर्मेश आणि आमीर अली हॉस्पिटलमध्य पोहोचले होते. आमीरने मुंबई मिररसोबत बोलताना सांगितले की, रेमोची तब्येत आता ठीक आहे. तर रेमोची पत्नी लिजेल डिसुजानेही सांगितले की, तो आता बरा आहे.

आमीर अलीने सांगितले की, तो अजूनही आयसीयूमध्ये आहे. शुद्धीवर आहे. असं वाटतंय की, तो आता ठीक होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेमोला शुक्रवारी दुपारनंतर हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याला लगेच कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. इथे त्याची एंजिओप्लास्टी करण्यात आली.

रेमोची पत्नी लिजेल डिसुजाने मिररला सांगितले की, रेमो आता आधीपेक्षा बरा आहे. रेमोची पत्नी लिजेल ही कॉस्च्युम डिझायनर आहे. तिला आणि रेमोला दोन मुलं आहेत. हॉस्पिटलमध्ये रेमोला भेटण्यासाठी अनेक धर्मेशसोबतच नोरा फतेही सुद्धा आली होती. रेमो फॅन्सही तो लवकर बरा होऊन परत यावा याची प्रार्थना करत आहे. 

टॅग्स :रेमो डिसुझाबॉलिवूड