Join us

'रहना है तेरे दिल में' चा येणार सीक्वल, विकी कौशल आणि क्रिती सनॉन दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 16:46 IST

आर माधवन आणि दिया मिर्झाचा चित्रपट 'रहना है तेरे दिल में' हा हिंदी चित्रपटातील सर्वात लोकप्रिय रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे.

२००१ मध्ये रिलीज झालेल्या आर माधवन आणि दिया मिर्झाचा चित्रपट 'रहना है तेरे दिल में' हा हिंदी चित्रपटातील सर्वात लोकप्रिय रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. इतक्या वर्षानंतरही सिनेमा लोकांच्या मनाच्या फार जवळ आहे. यातील गाणी आजही हीट आहेत. रिपोर्टनुसार लवकरच सिनेमाचा सीक्वल येणार अशी चर्चा आहे. विकी कौशल आणि क्रिती सनॉन यांची यात मुख्य भूमिका असणार आहे. 

पिंकविलच्या रिपोर्टनुसार , चित्रपटासंदर्भात विकी आणि क्रिती यांच्याशी सध्या बोलणे सुरु आहे.  मुख्य भूमिकेसाठी क्रितीने या भूमिकेसाठी इंटरेस्ट दाखवला आहे. तर मेकर्सनी विकीशीही संपर्क साधला आहे. रिपोर्टनुासर  'ते नव्या चेहऱ्याचा शोध घेत होते आणि  कास्टिंग डायरेक्टरने त्यांंना क्रिती आणि विकीचे नाव सुचवले.  दोन्ही स्टार्सना चित्रपट करण्यास इंटरेस्टड आहेत आणि शूटिंगच्या तारखांवर काम सुरू आहे.  2022 च्या अखेरीस चित्रपटाचे काम सुरू होईल.  

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर क्रिती प्रभाससोबत आदिपुरुषमध्ये झळकणार आहे. आदिपुरुषमध्ये प्रभास श्रीरामाची, क्रिती सीतेची आणि सनी लक्ष्मणाची भूमिका साकारणार असल्याचे समजते आहे. तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आणखी कोण कोण कलाकार पहायला मिळणार, यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. विकी कौशल 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. यात त्याच्यासोबत सारा अली खानची वर्णी लागली आहे.  

टॅग्स :विकी कौशलक्रिती सनॉन