Join us
Daily Top 2Weekly Top 5

REALLY!! आलिया भटनंतर आता नोरा फतेहीदेखील आहे प्रेग्नेंट? डान्स दीवाने ज्युनिअरच्या सेटवर अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 13:22 IST

Nora Fatehi : आलिया भटच्या प्रेग्नेंसीनंतर आता नोरा फतेहीनंही धक्कादायक खुलासा केला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे. ही माहिती खुद्द आलिया भटने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 'डान्स दीवाने ज्युनियर'च्या सेटवरही आलिया भटच्या प्रेग्नेंसीची अनेकदा चर्चा झाली होती. करण कुंद्रा आणि इतर सर्व क्रू मेंबर्सनीही नीतू कपूरचे आजी झाल्याबद्दल अभिनंदन केले. आलिया भटची प्रेग्नेंसी समोर आल्यानंतर 'डान्स दीवाने ज्युनियर'च्या सेटवरही प्रेग्नेंसीची चर्चा झाली होती, ज्यामध्ये नोरा फतेही(Nora Fatehi)ने धक्कादायक खुलासा केला होता. नोरा फतेहीने स्वेच्छेने सांगितले की ती गर्भवती आहे की नाही. नोरा फतेहीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

'डान्स दीवाने ज्युनियर'च्या सेटवरून व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नोरा फतेही, मर्झी आणि नीतू कपूर एकत्र दिसल्या होत्या. मर्जीने व्हिडीओमध्ये सांगितले की, आम्ही गर्भधारणेशी संबंधित गोष्टींवर चर्चा करण्यात व्यस्त होतो आणि यादरम्यान नोरा पुन्हा पुन्हा स्वत:कडे पाहत होती. यावर उत्तर देताना नोरा फतेही म्हणाली की, मी प्रेग्नेंट नाही. त्याच वेळी, मर्झीने देखील नोराची मस्करी केली. त्याने लगेच म्हटले की,अरे संपूर्ण जगाला सांगितल्याबद्दल धन्यवाद.

'डान्स दीवाने' ज्युनियर लवकरच फिनालेमध्ये पोहोचणार आहे, ज्याची शोभा वाढवण्यासाठी रणबीर कपूर आणि वाणी कपूर शोमध्ये हजेरी लावू शकतात. नोरा फतेही, मर्झी आणि नीतू कपूर या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहेत. नोरा आणि मर्झी यांनी यापूर्वी अनेक रिअ‍ॅलिटी शोजचे जज केले आहेत, तर नीतू कपूरचा हा पहिला रिअ‍ॅलिटी शो आहे. याबद्दल बोलताना नीतू कपूर स्वतः म्हणाली की, "मी या गोष्टीसाठी खूप उत्सुक होते, कारण इथे मला अनेक प्रकारचे नृत्य आणि शैली पाहायला मिळाली."

टॅग्स :नोरा फतेही