Join us

15 Years Ago!ज्युनियर बी अभिषेक आणि करिश्माचे लग्न मोडण्यात जुन्या जमान्यात गाजलेल्या या ‘अभिनेत्री’ ठरल्या ‘खलनायिका’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 12:52 IST

करिश्मा-अभिषेक बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. परंतु प्रेमाची सुरुवात अभिषेकची बहीण श्वेताच्या लग्नानंतर झाली. श्वेताचे लग्न करिश्माच्या आत्याचा मुलगा निखिल नंदासोबत झाले आहे.

कितने अजीब रिश्ते हैं यहाँ…. या गाण्याच्या ओळी बॉलीवुडसाठी अगदी चपखल बसतात. कारण इथे कधी नवी नाती बनतात आणि कधी बनलेली नाती अगदी सहज तुटतात याचा काही नेम नाही. कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतात तर कधी एकमेकांची तोंडंही न पाहणारे बंधनात अडकतात. असंच काहीसं घडलं ते बॉलीवुडचा ज्युनियर बी अर्थात अभिषेक बच्चनच्या आयुष्यात. 

 

ज्युनियर बी ऐश्वर्या राय बच्चनसह रेशीमगाठीत अडकला. त्यांचा आता सुखी संसार सुरु आहे. हे तर झालं अभिषेकच्या सध्याच्या आयुष्याबद्दल. मात्र अभिषेकच्या आयुष्यात आलेली पहिली तरुणी ही करिश्मा कपूर होती. करिश्मा-अभिषेक बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. परंतु प्रेमाची सुरुवात अभिषेकची बहीण श्वेताच्या लग्नानंतर झाली.

श्वेताचे लग्न करिश्माच्या आत्याचा मुलगा निखिल नंदासोबत झाले आहे. लग्नादरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. त्याचकाळात अभिषेकला 'रेफ्यूजी' हा पहिला सिनेमा मिळाला. या सिनेमात त्याच्या अपोझिट करिश्माची धाकटी बहीण करीना कपूर होती.करीना सेटवर अभिषेकला भावोजी अशी हाक मारायची असं बोललं जातं.करिश्मा नेहमी अभिषेकला भेटायला सेटवर यायची. अभिषेकचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला, मात्र दोघांचे प्रेम फुलतच गेले.

बिग बी अमिताभ यांनी त्यांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेक-करिश्माच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्वांना अभिषेक-करिश्माच्या प्रेमाविषयी समजले.दोघांचा साखरपुडाही झाला मात्र या नात्याला कुणाची तरी नजर लागली. अभिषेकसोबत लग्नानंतर करिश्माने सिनेमात काम करु नये, अशी जया बच्चन यांनी तिला अट घातल्याचे बोललं जातं.

ही अट करिश्माची आई बबिता यांना मात्र मान्य नव्हती. कारण त्याकाळी अभिषेकचे अनेक सिनेमे फ्लॉप होत होते. तर करिश्मा आघाडीची अभिनेत्री होती. अभिषेक कधी यशस्वी झालाच नाही तर अशी भिती बबिता यांना होती.शिवाय त्यांना अभिषेक पसंतच नव्हता. त्यामुळेच करिश्माने आईची भीती लक्षात घेत ठरलेला साखरपुडा मोडला. यानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबात प्रचंड मोठा वाद झाल्याचंही बोललं जातं.   

टॅग्स :करिश्मा कपूरअभिषेक बच्चन