Join us

सोन्यासारखं मन... रवीना टंडनने पापाराझींना भेट म्हणून दिले सोन्याचे कानातले, होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:21 IST

पापाराझींना आवडले रवीना टंडनचे कानातले, अभिनेत्रीनं भेट म्हणून देऊनच टाकले

Raveena Gifts Gold Earing To Paps: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही इंडस्ट्रीतील अतिशय सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. रवीना तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ती कायमच चर्चेत असते. रवीना टंडनची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता तिची लेक राशा थडानी (Rasha Thadani) हिनेही बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. ही माय-लेकीची जोडी पापाराझींची तर लाडकी आहे. दोघींना स्पॉट करण्याची कुठलीही संधी पापाराझी सोडत नाहीत. अशातच दोघींचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यांचं कौतुक केलं जात आहे.

अलिकडेच रवीना आणि राशा विमानतळावर स्पॉट झाल्या. दोघींनीही पापाराझींना निराश केले नाही. यावेळी थांबून त्या कॅमेरांना पोझ देताना दिसल्या. रवीना नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. यावेळी तिचा लुक अगदी साधा होता. तिनं कानात सुंदर एअररिंग्स परिधान केले होते. यावेळी एका पापाराझीने तिच्या एअररिंग्सचं कौतुक केलं. तर तिनं थेट काढून ते त्याला भेट म्हणून दिले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

अनेकांनी रवीना टंडनच्या उदारतेचे कौतुक केलं आहे. याआधीही रवीनाने तिच्या लग्नातील सोन्याच्या बांगड्या एका सामूहिक विवाहात दान केल्या होत्या. रवीना टंडन ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या सामाजिक कार्य आणि धर्मादाय कार्यासाठी नेहमीच चर्चेत असते. रवीना टंडनचे चाहते तिच्या पुढील प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्री लवकरच 'वेलकम टू जंगल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रवीनासोबत अक्षय कुमार, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर असे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल. 

टॅग्स :रवीना टंडनबॉलिवूड