Join us  

पाहा सनी देओलच्या कुटुंबियांचे फोटो, इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आईसोबतचे अनेक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 2:52 PM

पंजाबमधील गुरुदासपूर मतदार संघातून अभिनेता सनी देओल आघाडीवर आहे. पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो...

ठळक मुद्देसनीचे लग्न पूजा देओलसोबत झाले असून त्यांना करण आणि राजवीर अशी दोन मुले आहेत. करणने यमला पगला दिवाना २ या चित्रपटाच्या वेळी साहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची गेल्या कित्येक दिवसांपासून सगळे वाट पाहात होते. मतदान मोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असून पंजाबमधील गुरुदासपूर मतदार संघातून अभिनेता सनी देओल आघाडीवर आहे. बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून सनी ओळखला जातो. सनी देओल धर्मेन्द्र यांचा मुलगा आहे, हे आपण सगळेच जाणतो.

पण सनी देओलची पत्नी आणि मुले यांच्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. सनी देओल अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. त्याच्या अनेक फोटोंमध्ये वडील धर्मेंद्र, भाऊ बॉबी देओल, मुलगा करण आणि त्याच्या आईला आपल्याला पाहायला मिळते. 

सनी देओलने बेताब या चित्रपटाद्वारे त्याच्या चित्रपटामधील कारकिर्दीला सुरुवात केली. या पहिल्याच चित्रपटातील त्याच्या भूमिकाला प्रेक्षकांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने घायल, दामिनी, गदरः एक प्रेम कथा, बॉर्डर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. अभिनयासाठी त्याला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

पंजाबमध्ये जन्मलेल्या सनीला बॉबी, विजेता, अजीता ही भावंडं आहेत. बॉबी देखील अनेक वर्षांपासून चित्रपटात काम करत असून तो नुकताच रेस ३ या चित्रपटात झळकला होता. सनीच्या बहिणी विजेता आणि अजीता या मीडियापासून दूर राहाणेच पसंत करतात. 

सनीचे लग्न पूजा देओलसोबत झाले असून त्यांना करण आणि राजवीर अशी दोन मुले आहेत. करणने यमला पगला दिवाना २ या चित्रपटाच्या वेळी साहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. आता तो पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट सनी दिग्दर्शित करणार आहे. 

सनी देओलच्या मुलांना अनेकवेळा मीडियात पाहायला मिळते. तसेच तो देखील मुलांचे फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करतो. पण त्याची पत्नी पूजाचे फोटो त्याच्या कोणत्याच सोशल नेटवर्किंग साईटवर पाहायला मिळत नाही. पूजा नेहमीच बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियापासून दूर राहाणेच पसंत करते.  

टॅग्स :सनी देओललोकसभालोकसभा निवडणूक २०१९लोकसभा निवडणूक निकाल