अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) बऱ्याच काळापासून गायब आहे. लेकीच्या जन्मानंतरही तो फारसा कुठे दिसला नाही. तरी एका सिनेमाच्या शूटिंग सेटवरुन कायम त्याचे फोटो येत राहिले. तो म्हणजे 'धुरंधर'. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' (Dhurandhar) सिनेमात रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर माधवन अशी तगडी स्टारकास्ट आहे. दरम्यान रणवीर या सिनेमाचं शूट संपवून 'डॉन ३'च्या तयारीला लागणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर सिंह १५ ऑक्टोबर पर्यंत 'धुरंधर' सिनेमाचं शूट संपवणार आहे. सध्या या सिनेमाचं शेवटचं शेड्युल जोरात सुरु आहे. नंतर इतर स्टारकास्ट १० दिवस शूट करणार आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर मेकर्स सिनेमाचं प्रमोशनही सुरु करतील अशी शक्यता आहे. त्यासोबत एडिट वर्क सुरु राहणार आहे. ५ डिसेंबर ही सिनेमाची रिलीज डेट ठरली आहे. खरंतर सिनेमाचं ६५ टक्के एडिट वर्क पूर्ण झालं आहे. सिनेमाची पहिली कॉपी ऑक्टोबरच्या शेवटी तयार होईल. ५ डिसेंबरच्या रिलीजसाठी सिनेमाची टीम पोस्ट प्रोडक्शनचं काम करत आहे.
दुसरं म्हणजे रणवीर सिंहची 'डॉन ३'मध्येही वर्णी लागली आहे. फरहान अख्तरच्या या सिनेमात आता शाहरुख खान नाही तर रणवीर सिंह डॉन असणार आहे. याही सिनेमाच्या प्री प्रोडक्शनवर काम सुरु आहे. तर रणवीर सिंह जानेवारी मध्ये 'डॉन ३'चं शूट सुरु करेल अशी चर्चा आहे. त्याआधी फरहानसोबत तो स्क्रिप्ट रिडींग सेशनही करेल. अॅक्शन टीमसोबतही चर्चा होईल. रणवीर सिंहला या सिनेमात दमदार अॅक्शन सीन्स करतानाल दाखवायचा मेकर्सचा विचार आहे. तसंच सिनेमाचं शेड्युल युरोपमध्ये प्लॅन केलं गेलं आहे. हा डॉन फ्रँचायझीया सर्वात महागडा सिनेमा होऊ शकतो.
याशिवाय रणवीर सिंह जय मेहता यांचा झॉम्बी सिनेमातही दिसणार आहे. २०२६ मध्ये दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये सिनेमा फ्लोरवर जाणार आहे. मॅडॉक फिल्म्स सिनेमाची निर्मिती करणार असून अमित शर्मा दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षात रणवीर सिंह अनेक सिनेमांमधून कमाल करणार आहे.