Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीरचा 'धुरंधर २' सगळ्यांवर पडला भारी! ११ दिवसांत केलं इतकं कलेक्शन, मोडला 'पुष्पा २'चा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 10:33 IST

'धुरंधर २'ची रेकॉर्डब्रेक कमाई,११ दिवसात 'पुष्पा २'ला धोबीपछाड

Dhurandhar 2 Box Office Collection Day 11: आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टार 'धुरंधर: द रिव्हेंज' किंवा 'धुरंधर २' हा चित्रपट १९ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. अगदी 'धुरंधर' प्रमाणेच 'धुरंधर २' देखील पहिल्याच दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड करत आहे.  फक्त प्रेक्षकच नाहीतर अनेक कलाकार देखील हा सिनेमा पाहून भरभरून कौतुक करत आहे. आदित्य धरचं दिग्दर्शन, कथा आणि कलाकारांचा अभिनय एकूणच सगळं उत्तम असल्याने सिनेमाची सर्वत्र वाहवाह होते आहे. 

एकीकडे काहींनी या चित्रपटाला प्रपोगंडा असल्याचं म्हटलं आहे. याबद्दल जरी अनेकांची मतमतांतरे असली तरीही सिनेमाला दिवसेंदिवस अधिकच उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.चित्रपटाच्या कमाईच्या आकड्याने सर्वांनाच चकीत केलं आहे. शिवाय अनेक बिग बजेट सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 

'धुरंधर २' ने ११ दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला!

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रणवीरच्या ‘धुरंधर 2’ने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात ६७४.१७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर नवव्या दिवसाची कमाई ४१.७५ कोटी रुपये तर दहाव्या दिवशी या चित्रपटाने ६२.८५ कोटींचा व्यवसाय केला. त्यात आता चित्रपटाच्या अकराव्या दिवसाची कमाई देखील समोर आली आहे. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार ‘धुरंधर २’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी बॉक्स ऑफिसवर  तब्बल ६८.१० कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. एकूण चित्रपटाची  कमाई ८६६.७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.तर चित्रपटाने भारतात १०११.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'पुष्पा २' चा रेकॉर्ड मोडला...

आदित्य धरच्या चित्रपटाने अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २: द राइज'  या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. यासह, 'धुरंधर: द रिव्हेंज'ने ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत आपलं स्थान पक्क केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer's 'Dhurandhar 2' Dominates, Surpasses 'Pushpa 2' in Box Office!

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' is a box office hit, earning ₹866.70 crore in eleven days. The film directed by Aditya Dhar surpassed Allu Arjun's 'Pushpa 2' in collections, securing its place among blockbusters despite mixed reviews.
टॅग्स :रणवीर सिंगधुरंधर सिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाबॉक्स ऑफिस कलेक्शन