Dhurandhar Franchaise Big Records:आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'या फ्रँचायझीने जगभरात मोठी क्रेझ निर्माण केली आहे. या फ्रँचायझीने जगतिक स्तरावर इतिहास रचला आहे. रणवीर सिंह स्टारर'धुरंधर' प्रमाणे ‘धुरंधर 2’ चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सध्या अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. देशासह जगभरात हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-थ्रिलर चित्रपटाने प्रदर्शनानंतर फक्त अवघ्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं आहे. संपूर्ण जगभरातून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. 'धुरंधर'च्या दोन्ही भागांनी जगभरात आता ३००० कोटींचा व्यवसाय करत इतिहास रचला आहे.
दरम्यान, धुरंधर हा चित्रपट डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची भारतात एकूण १००० कोटी इतकी कमाई झाली. जगभरात, 'धुरंधर'ने जवळपास ३०० कोटी रुपये कमावले, ज्यामुळे चित्रपटाने तिकीटबारीवर एकूण १३०० कोटी इतका व्यवसाय केलाची माहिती मिळते आहे. हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला.
'धुरंधर २' सुद्धा काही ऐकत नाय...
'धुरंधर' प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच, त्याचा सिक्वेल 'धुरंधर द रिव्हेंज' १९ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या भागाप्रमाणे धुरंधरचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात १७०० कोटींहून अधिक गल्ला जमवला असून चित्रपट अनेक ठिकाणी चांगला व्यवसाय करत आहे. भारतात १ हजार कोटींचा टप्पा ओलांडणारा हा पहिला चित्रपट ठरला, त्यामुळे हा स्पाय-थ्रिलर चित्रपट देशातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.
'धुरंधर' फ्रँचायझीची जगभरातील कमाई
'धुरंधर' फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम रचले आहेत.या दोन्ही चित्रपटांची भारतातील कमाई १,९२३ कोटींहून अधिक आहे. तर या दोन्ही चित्रपटांचे जगभरातील एकूण कलेक्शन ३ हजार कोटी रुपये इतकं आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा ही पहिलीच फ्रॅंचायझी ठरली आहे.
Web Summary : Aditya Dhar's 'Dhurandhar' franchise creates history, earning ₹3000 crores worldwide. 'Dhurandhar 2' continues its success, grossing ₹1700 crores globally and becoming a top-grossing Indian film.
Web Summary : आदित्य धर की 'धुरंधर' फ्रेंचाइजी ने इतिहास रचा, दुनिया भर में ₹3000 करोड़ कमाए। 'धुरंधर 2' की सफलता जारी है, जिसने विश्व स्तर पर ₹1700 करोड़ कमाए और यह शीर्ष कमाई करने वाली भारतीय फिल्म बन गई।