आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चाहते 'धुरंधर २'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमात रणवीर सिंहने हमजा अलीची भूमिका साकारली. त्याच्या अभिनयाचं सगळीकडून कौतुक होत आहे. २०२३ साली आलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमानंतर दोन वर्षांनी रणवीर सिंहने या वर्षीअखेरीस दमदार कमबॅक केलं आहे. दरम्यान 'धुरंधर'च्या यशाची चर्चा सुरु असतानाच रणवीर 'डॉन ३'मधून बाहेर पडल्याच्या चर्चा आहेत. या सगळ्यात रणवीर आणि दीपिका न्यूयॉर्कमध्ये वेळ घालवत आहेत. नुकतंच रणवीरने एका चाहतीसोबत फोटो क्लिक केला जो आता व्हायरल होतोय.
'धुरंधर'च्या रिलीज आणि यशानंतर रणवीर सिंह माध्यमांसमोर खूप कमी वेळा आलेला दिसतोय. नुकताच तो पत्नी दीपिका आणि लेकीसोबत न्यूयॉर्कला रवाना झाला. तिथे तो कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम घालवत आहे. त्याची चाहत्यांची संख्या काही कमी नाही. न्यूयॉर्कमध्येही एक चाहती त्याला भेटली. रणवीरने तिच्यासोबत फोटोही क्लिक केले. त्या चाहतीच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिने ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून आता व्हायरल होत आहेत. यामध्ये दीपिकाचीही झलक दिसत आहे
'धुरंधर'ने आतापर्यंत जगभरात १ हजार कोटी पार गल्ला जमवला आहे. सिनेमाने 'स्त्री','जवान','गदर २','अॅनिमल','छावा' अशा सर्वच सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. रणवीर सिंहचा हा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. पुढील वर्षी १९ मार्च रोजी सिनेमाचा पुढचा भाग प्रदर्शित होणार आहे. यासाठीही चाहते उत्सुक आहेत.
Web Summary : 'Dhurandhar' success, Ranveer Singh, amid 'Don 3' exit rumors, vacations in New York with Deepika. Fan photo goes viral.
Web Summary : 'धुरंधर' की सफलता के बीच, रणवीर सिंह 'डॉन 3' से बाहर होने की अफवाहों के बीच दीपिका के साथ न्यूयॉर्क में छुट्टियां मना रहे हैं। फैन फोटो वायरल।