Join us

Ranveer Singhचा सासरवाडीत होतोय असा पाहुणचार, अभिनेत्याने शेअर केलं फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:18 IST

अभिनेता रणवीर सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याच्या प्रोफोशनल आणि पर्सनल आयुष्याशी संबंधित माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

अभिनेता रणवीर सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतो. दुसरीकडे, रणवीरने पुन्हा एकदा त्याच्या सासरवाडीचे फोटो शेअर केले आहेत. . ज्यामध्ये तो दीपिकाच्या आई-वडिलांसोबत क्वालिटी टाइम स्पेंट करतोय. 

सध्या रणवीर सिंग त्याच्या सासरच्या मंडळींकडे दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांच्या घरी पाहुणचार घेत आहे. रणवीर आणि दीपिका दोघेही बंगळुरूमध्ये आहेत. रणवीरने इंस्टाग्राम स्टोरीवर त्याच्या सासरचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील काही फोटो रणवीरच्या पाहुणचाराचे आहेत तर काही जुन्या आठवणींचे आहेत. यामध्ये एक फोटो दीपिकाच्या बालपणीचा आहे, ज्यामध्ये अभिनेत्री खूपच क्युट दिसतेय. 

रणवीरने रविवारी बंगळुरूमध्ये सासरच्यांसोबतचे हे फोटो शेअर केले आहेत. त्याने बदाम मिल्क आणि चिरोटी हलू नावाचा गोड पदार्थचा फोटो शेअर केला आहे. हा गोड पदार्थ कर्नाटकातील प्रसिद्ध स्वीट डिश आहे. आता या चविष्ट जेवणासोबतच रणवीर सिंगचा सासरवाडीमध्ये चांगलाच पाहुणचार होतोय. यापूर्वी, रणवीरने न्यूयॉर्कमधील खरेदीपासून ते खाण्यापिण्यापर्यंतचे फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. आलीकडेच रणवीरला 83’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोण