आशा भोसले यांचं काल १२ एप्रिलला निधन झालं. आशा भोसले यांच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे. आशाताईंच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी सर्वजण त्यांना धीर द्यायला पुढे आले. राजकीय व्यक्तींपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आशा भोसले यांचं आज अंतिम दर्शन घेतलं. अशातच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगही आशाताईंचं अंतिम दर्शन घेताना भावुक झालेला दिसला. रणवीरने आशाताईंच्या नातीला दिला धीरबॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग दुपारी आशाताईंच्या निवासस्थानी त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचला. त्यावेळी रणवीरने शांतपणे हात जोडून आशाताईंच्या पार्थिवाला नमस्कार केला. रणवीरही काहीसा भावुक झालेला दिसत होता. पुढे रणवीर जात होता इतक्यात काहीसा मागे वळला. त्याने आशाताईंची नात जनाईची आवर्जुन भेट दिली. रणवीरला पाहताच जनाईचाही बांध फुटला. रणवीरने तिला मिठी मारुन तिच्या पाठीवर हात ठेवला आणि धीर दिला. अशाप्रकारे रणवीरही भावुक झालेला दिसला.
Web Summary : Ranveer Singh became emotional while attending Asha Bhosle's final rites. He consoled Asha Bhosle's granddaughter, Janai, offering her support and comfort during the difficult time. Many personalities paid their last respects.
Web Summary : आशा भोसले के अंतिम संस्कार में रणवीर सिंह भावुक हो गए। उन्होंने आशा भोसले की नातिन जनाई को सांत्वना दी और इस कठिन समय में उन्हें सहारा और आराम दिया। कई हस्तियों ने अंतिम श्रद्धांजलि दी।