Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीरच्या 'बॅंड बाजा बारात'ला १० वर्षे पूर्ण, सिनेमासाठी दुसराच अभिनेता झाला होता फायनल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 09:28 IST

याच सिनेमातून अभिनेता अभिनेता रणवीर सिंहने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. सिनेमाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अनुष्काने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केलाय.

रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माचा रोमॅंटिक कॉमेडी 'बॅंड बाजा बारात' सिनेमाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक मनीष शर्माचा हा सिनेमा १० डिसेंबर २०२० ला रिलीज झाला होता. याच सिनेमातून अभिनेता अभिनेता रणवीर सिंहने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. सिनेमाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अनुष्काने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केलाय.

अनुष्का शर्माने गुरूवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'बॅंड बाजा बारात'चा एक व्हिडीओ शेअर केलाय. तर रणवीर सिंहने बॉलिवूडमधील करिअरला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर केले आहेत. या सिनेमात रणवीर सिंहने दिल्लीतील तरूण बिट्टू शर्माची भूमिका साकारली होती तर अनुष्का शर्माने वेडिंग कोऑर्डिनेटरची सहायक श्रुति कक्करची भूमिका साकारली होती.

रणवीर नव्हता पहिली पसंत

या 'बॅंड बाजा बारात' सिनेमाबाबतची खास बाब म्हणजे रणवीर सिंह हा या सिनेमासाठीची पहिली पसंत नव्हता. दोन वर्षांपूर्वी एका मुलाखतीत रणवीर सिंहने सांगितले होते की, बॅंड बाजा बारातसाठी रणबीर कपूरला घेण्याची तयारी सुरू होती.

रणवीर सिंहच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर दिग्दर्शक कबीर सिंहच्या '८३'मध्ये तो दिसेल. या सिनेमात रणवीर सिंह क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत दिलेस. तर अनुष्का शर्माही प्रेग्नेंट असून आपली प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे. ती जानेवारीमध्ये बाळाला जन्म देणार आहे.  

टॅग्स :रणवीर सिंगअनुष्का शर्माबॉलिवूड