Join us
Daily Top 2Weekly Top 5

आग लगने वाली है! 'धुरंधर' सेटवरील रणवीर अन् संजूबाबाचा व्हिडिओ लीक; चाहत्यांना आठवला 'खिलजी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:40 IST

आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमाच्या शूटचा आणखी एक व्हिडिओ लीक

'धुरंधर' (Dhurandhar) या आगामी सिनेमाची सध्या बीटाऊनमध्ये चर्चा आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमाची स्टारकास्टही तगडी आहे. रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन आणि अक्षय खन्ना असे दिग्गज या सिनेमात आहेत. पंजाब आणि मुंबईत सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. अनेकदा शूटिंग सेटवरील व्हिडिओ लीक झाले आहेत. यात रणवीर सिंह आणि संजय दत्तची झलक दिसली आहे. आता पुन्हा एकदा त्यांचा सेटवरील एक व्हिडिओ समोर आला आहे.

रणवीर सिंहचा पुन्हा 'खिलजी' अवतार

'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंह आणि संजय दत्तचं भारदस्त व्यक्तिमत्व पाहायला मिळणार आहे. रणवीर सिंहचा 'पद्मावत'मधील खिलजी अवतार पुन्हा दिसत आहे. तर संजय दत्तचाही लूक खतरनाक आहे. लांब केस, दाढी आणि पठाणी सूटमध्ये रणवीरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर पांढरा लांब कुर्ता, खांद्यावर शाल या लूकमध्ये संजय दत्त किलर लूक देताना दिसतोय. दोघांना पाहून चाहत्यांनी 'आग लगने वाली है' अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

या लीक झालेल्या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. संजूबाबा प्रमाणेच रणवीर सिंहलाही चाहते प्रेमाने 'बाबा' म्हणतात. त्यामुळे अनेकांनी 'बाबा x 2 = फायर','पॉवर हाऊस रणवीर बाबा आणि संजू बाबा','धुरंधर किलर सीन' अशा कमेंट्स केल्या आहेत. 

'धुरंधर' मध्ये या दोघांसोबतही अर्जुन रामपाल, आर माधवन आणि अक्षय खन्ना हे पॉवरफुल अभिनेतेही आहेतच. रणवीर सिंहने सिनेमाची घोषणा करताना हा सिनेमा आतापर्यंतचा त्याचा सर्वात धाँसू असेल असं सांगितलं होतं. त्यामुळे चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :रणवीर सिंगसंजय दत्तव्हायरल व्हिडिओबॉलिवूड