फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन' फ्रँचायझीचा तिसरा भार रखडला आहे. काही महिन्यांपूर्वी फरहानने सिनेमाची घोषणा करत रणवीर सिंह पुढचा डॉन असणार असं जाहीर केलं होतं. मात्र 'धुरंधर' सिनेमाच्या यशानंतर रणवीर सिंह 'डॉन ३'मधून बाहेर पडल्याचं समोर आलं. आता डॉन कोण बनणार असा प्रश्न पडला. या प्रकरणावरुन फरहान आणि रितेश सिधवानीच्या एक्सेल एंटरटेन्मेंटने रणवीर सिंहवर ४० कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा केला. रणवीर आणि फरहानमध्ये चांगलंच बिनसलं असल्याचं दिसत आहे. दरम्यान दोघांमधला वाद सोडवण्यासाठी परफेक्शनिस्ट आमिर खान मध्यस्थी करणार असल्याची अपडेट आता समोर आली आहे.
हिंदुस्तान टाईम्सनुसार, फरहान अख्तर आणि रणवीर सिंहमधला वाद सोडवण्यासाठी आमिर खान पुढे आला आहे. काही दिवसांपूर्वी गुरुवारी संध्याकाळी अनेक मुख्य निर्माते आमिरच्या बंगल्यावरुन बाहेर पडताना दिसले. यामध्ये करण जोहर, साजिद नाडियाडवाला, एकता कपूर, एक्सेल एंटरटेन्मेंटचे फरहान आणि रितेश सिधवानी, झोया अख्तर आणि पुनीत गोयंका यांचा समावेश आहे. ही मीटिंग स्टार अभिनेता रणवीर सिंह आणि एक्सेल एंटरटेन्मेंट यांच्यातील वाद सोडवण्यासाठीच होती असंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने मध्यस्थी करत या मीटिंगचं आयोजन केलं.
दरम्यान वाद सुरु झाला तेव्हाच फरहान अख्तरने रणवीर सिंहला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. दोघांनी 'दिल धडकने दो' सिनेमात एकत्र काम केलं होतं. अद्याप रितेश आणि रणवीर दोघांकडूनही या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.
Web Summary : Aamir Khan is reportedly mediating between Farhan Akhtar and Ranveer Singh regarding the 'Don 3' fallout after Singh allegedly exited the film. Producers are seeking compensation. The Producers Guild organized a meeting at Aamir's house to resolve the dispute.
Web Summary : खबर है कि आमिर खान, फरहान अख्तर और रणवीर सिंह के बीच 'डॉन 3' को लेकर हुए विवाद को सुलझाने की कोशिश कर रहे हैं, सिंह के फिल्म छोड़ने की अफवाह है। निर्माताओं ने मुआवजे की मांग की है। प्रोड्यूसर्स गिल्ड ने आमिर के घर पर एक बैठक आयोजित की है।