Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता सांगा! रणवीर सिंहने घातले दीपिकाचे दागिने? फॅन्ससोबतच अर्जुन कपूरनेही घेतली मजा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 10:06 IST

रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात तो व्हाइट टीशर्टसोबत मोत्यांची माळ घातलेला आणि डायमंड स्टड घातलेला दिसत आहे.

रणवीर सिंह हा त्याच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. तो नेहमीच अशा आउटफिट्समध्ये आणि अ‍ॅक्सेसरीजमध्ये दिसतो की, सगळीकडे त्याचीच चर्चा होऊ लागते. त्याने नुकतीच केलेली एक स्टाइल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोवर सोशल मीडिया यूजर्सकडून अनेक मजेदार कमेंट्स केल्या जात आहेत. केवळ फॅन्सच नाही तर या फोटोवर अभिनेता अर्जुन कपूरने देखील कमेंट केली आहे.

रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात तो व्हाइट टीशर्टसोबत मोत्यांची माळ घातलेला आणि डायमंड स्टड घातलेला दिसत आहे. सोबत त्याने सनग्लासेससोबत बेसबॉल कॅपही घातली आहे.

या फोटोत रणवीर सिंह बाल्कनीत आहे आणि मागे समुद्र दिसतो आहे. कॅप्शनला रणवीर सिंहने लिहिले की, 'सुहाना सफर और ये मौसम हसीं...' त्याच्या इन्स्टा फॉलोअर्सचं लक्ष रणवीर सिंहच्या नेकपीसने वेधलं. जास्तीत जास्त लोकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, हा हार दीपिका पादुकोनचा आहे का?. एका दुसऱ्या यूजरने लिहिले की, दीपिका तिची माळ शोधत आहे. एकाने कमेंट केली की, दीपिकाच्या गळ्यातील हार, लोकांना हे जाणून घ्यायचं आहे? तर यावर अर्जुन कपूर म्हणाला की, 'बाबा तू हिरा नाही मोती आहेस'.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर रणवीर स्पोर्ट्स ड्रामा '83' मध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. यात तो कपिल देवची भूमिका साकारणार आहे आणि त्याच्या वाइफच्या भूमिकेत दीपिका पादुकोन दिसणार आहे.  

 

टॅग्स :रणवीर सिंगअर्जुन कपूरबॉलिवूडसोशल व्हायरल