बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि तितकंच गाजलेलं नाव म्हणजे राणी मुखर्जी. अभिनयासोबतच सौंदर्यामुळे लोकप्रिय असलेल्या राणीची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा होत असते. सध्या राणी तिच्या एका जुन्या अनुभवामुळे चर्चेत येत आहे. आज सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीला एकेकाळी तिच्या रंगरुपावरुन आणि खासकरुन तिच्या उंचीवरुन अनेकांनी ट्रोल केलं होतं.
करिअरच्या सुरुवातीला राणीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेकांनी तिला ट्रोल केलं. एका मुलाखतीमध्ये राणीने तिला आलेल्या अनुभवांचं कथन केलं.विशेष म्हणजे एकेकाळी ट्रोल झालेल्या राणीला 8 फिल्मफेयर अवॉर्ड आणि राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.
''मी माझ्या चाहत्यांचे मनापासून आभार मानते. एक कलाकार जसा असतो तसंच त्याला त्या रुपात स्वीकारणं हा चाहत्यांचा निर्णय असतो. इंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात माझा आवाज डब केला जायचा. परंतु, प्रेक्षकांना माझा खरा आवाज आवडू लागला. आणि, त्यांच्या याच ताकदीमुळे टिकाकारांची तोंड आपोआप बंद झाली'', असं राणी म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले. मात्र, देव जे आयुष्य दिलंय त्याच्यासाठी आपण कायमच त्याचे आभार मानले पाहिजेत. पुढे नशीबात जे होईल ते होईल. पण त्याने आपल्याला आयुष्य दिलंय त्यामुळे त्या आयुष्याचं सार्थक झालं पाहिजे. आपण काही ना काही केलंच पाहिजे. मी इंडस्ट्रीत काम करते, तसंच अनेक जण देशसेवा करत आहेत. कोणी डॉक्टर होऊन, कोणी सिमेवर शत्रूशी लढा देऊन.''
राणीच्या पदरात पडले 8 फिल्मफेयर अवॉर्ड
हम तुम, युवा, साथिया, ब्लॅक, नो वन किल्ड जेसिका’ ,‘मिसेस चटर्जी वर्सेस नार्वे’ यांसारख्या सिनेमांसाठी राणीला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर ,‘मिसेस चटर्जी वर्सेस नार्वे’ या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. दरम्यान, राणीने १९९६मध्ये ''बियेर फूल'' या बंगाली सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर राजा की आयेगी बारात या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कुछ कुछ होता हैं हा सिनेमा राणीसाठी टर्निंग पॉइंट ठरला. या सिनेमानंतर तिने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं.
Web Summary : Rani Mukerji faced criticism for her looks early in her career. She overcame this, winning Filmfare and a National Award for 'Mrs. Chatterjee vs Norway'. She acknowledges fans' acceptance and emphasizes contributing to society.
Web Summary : रानी मुखर्जी को शुरुआती करियर में रंगरूप के लिए आलोचना का सामना करना पड़ा। उन्होंने इस पर काबू पाया, 'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे' के लिए फिल्मफेयर और राष्ट्रीय पुरस्कार जीता। उन्होंने प्रशंसकों की स्वीकृति को स्वीकार किया और समाज में योगदान करने पर जोर दिया।