Join us

'गणराज रंगी नाचतो...' गाण्यावर थिरकली 'रंगीला' गर्ल, उर्मिला मातोंडकरच्या व्हिडीओला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:44 IST

Urmila Matondkar : बॉलिवूडची 'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकर हिने सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती गणराज रंगी नाचतो या गाण्यावर थिरकताना दिसते आहे.

सगळीकडे मोठ्या धामधुमीत गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. संपूर्ण राज्यात ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपतीची मूर्ती घरात आणली जात आहे. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पसरले आहे. कलाकार मंडळीही सोशल मीडियावर घरच्या बाप्पाचे फोटो शेअर करत चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान बॉलिवूडची 'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती गणराज रंगी नाचतो या गाण्यावर थिरकताना दिसते आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने इंस्टाग्रामवर पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. तिने ड्रेसमध्ये गळ्यात हेवी नेकलेस आणि कानात मोठे इअररिंग्स घातले आहेत. तिने केस मोकळे सोडून तिचा लूक पूर्ण केलाय. या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. 

याव्यतिरिक्त उर्मिला मातोंडकरने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती गणराज रंगी नाचतो या गाण्यावर डान्स स्टेप करताना दिसते आहे. या गाण्यावर तिने खूप छान डान्स केला आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, गणपती बाप्पा मोरया. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. 

'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरने नव्वदच्या दशकात सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. तिने बॉलिवूडच्या तिन्ही खानांसोबत काम केले आहे. तिचे लोकप्रिय गाणे 'छम्मा छम्मा' अजूनही ऐकायला मिळते. उर्मिलाने हिंदी, मराठी, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती शेवटची 'ब्लॅकमेल' (२०१८) या हिंदी चित्रपटात दिसली होती. २०१४ साली ती आजोबा या मराठी सिनेमात झळकली.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरसेलिब्रिटी गणेशगणेश चतुर्थीगणेशोत्सव 2025