अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) सध्या फ्रान्समध्ये आहे. नुकतंच तिने ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलं. कान्सच्या रेड कार्पेटवर आलियाने जलवा दाखवला. तिचे एकापेक्षा एक लूक पाहून चाहते घायाळ झाले. ज्या आत्मविश्वासाने ती रेड कार्पेटवर आली ते पाहून सर्वांनीच तिचं कौतुक केलं. आलिया फ्रान्समध्ये असताना इकडे बाबा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लेक राहाची (Raha Kapoor) काळजी घेत आहे. कालच रणबीर राहाला घेऊन मुंबईतील माऊंट मेरी चर्चेमध्ये आला होता. बापलेकीचा क्युट व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर स्टारकिड्सचे फोटो, व्हिडिओ वेगाने व्हायरल होतात. सध्या रणबीर आणि आलियाची लेक राहा कपूर सर्वांचीच लाडकी आहे. बऱ्याच दिवसांनी चाहत्यांना राहाची झलक पाहायला मिळाली. रणबीर कपूर लाडक्या लेकीसोबत माऊंट मेरी चर्चेमध्ये आला. तो राहाला कडेवर घेऊन चर्चच्या पायऱ्या चढत असतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यानंतर राहाला कारमध्ये बसवून तो चाहत्यांसोबत फोटोही काढतो. रणबीर व्हाईट टीशर्ट, डोक्यावर कॅप अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. तर राहाला गुलाबी रंगाचा क्युट फ्रॉक घातला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान रणबीर आणि आलियाने लेकीचे फोटो काढायला पापाराझींना मनाई केली आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर दोघांनी पापाराझींना विनंती केली. आता बरेच दिवसांनी राहाची जलक दिसली. मात्र तिच्या चेहरा इमोजीने लपवण्यात आला आहे.
राहा कपूरचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. ती सध्या अडीच वर्षांची आहे. राहाच्या क्युटनेसने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं होतं. निळे डोळे, गोरे गाल असे कपूर चेच लूक्स तिच्यातही आले आहेत.