Join us

Dhoom 4! जॉन, हृतिक अन् आमिरनंतर आता कोण साकारणार व्हिलन? 'या' हिरोचं नाव समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:19 IST

'धूम'च्या प्रत्येक पार्टमध्ये व्हिलनची भूमिका वेगवेगळ्या अभिनेत्याने केली आहे.

'धूम' सीरिज बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी आहे. आतापर्यंत सिनेमाचे तीन भाग आले आहेत. तर आता सिनेमाच्या चौथ्या भागाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खान अशा तिघांनी धूममध्ये काम केलं आहे. आता 'धूम ४' (Dhoom 4) मध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दिसणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

धूमच्या प्रत्येक पार्टमध्ये व्हिलनची भूमिका वेगवेगळ्या अभिनेत्याने केली आहे. त्यामुळे आता 'धूम ४' मध्येही वेगळाच अभिनेता दिसणार आहे. आधी शाहरुख खानच्या नावाची चर्चा होती. पण आता रणबीर कपूरची 'धूम ४' मध्ये दमदार एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. सिनेमाच्या शूटबद्दलही काही अपडेट समोर आले आहेत. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात 'धूम ४' च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. सिनेमाच्या कथेवर काम करायला सुरुवात झाली आहे. तसंच रणबीरसोबत २ अभिनेत्री दिसू शकतात ज्या लीड मध्ये असतील.  आदित्य चोप्राच्या 'धूम'चा चौथा भाग  एकदम खास असणार आहे. सिनेमाच्या एकूणच कास्टिंगच काम लवकरच सुरु होत आहे. 

अॅनिमल नंतर रणबीरचं नशीबच पालटलं आहे. त्याच्याकडे 'अॅनिमल'चे आणखी दोन सीक्वेल, 'लव्ह अँड वॉर', आणि 'रामायण' अशा महत्वपूर्ण प्रोजेक्ट्सची रांग आहे. शिवाय आता 'धूम' फ्रँचायझीमध्ये तो एन्ट्री घेत असल्याने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूड