Join us

कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 11:57 IST

सोशल मीडियावर आलिया भट चांगलीच ट्रोल होत आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी. त्यांच्यावर जितका प्रेमाचा वर्षाव होतो तितकेच ते ट्रोलही होतात. काही ना काही कारणांमुळे त्यांच्यावर टीका होते. कधी त्यांची एकमेकांबद्दलची वक्तव्येही लक्ष वेधून घेतात. असाच एक खुलासा रणबीरने नुकताच केला ज्यामुळे आता आलिया ट्रोल होत आहे. किशोर कुमार कोण? असा प्रश्न आलियाने पहिल्या भेटीत विचारला असा खुलासा रणबीरने केला.

रणबीर कपूरने नुकतीच गोवा येथील फिल्म फेस्टिव्हल सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्याने फिल्म इंडस्ट्रीतील राज कपूर यांचं योगदान अधोरेखित केलं. आयकॉनिक व्यक्तिमत्वांना जाणून घेणं किती गरजेचं आहे हेही त्याने सांगितलं. आपलं म्हणणं मांडताना त्याने आलियाचंच उदाहरण दिलं. तो म्हणाला, "जेव्हा आलिया मला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिला किशोर कुमार कोण हेच माहित नव्हतं. आयुष्य हे गोल आहे. नवीन आर्टिस्ट येतात आणि लोक विसरुन जातात."

रणबीरच्या या खुलाश्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. अनेकांनी असा तर्क लावला की रणबीर-आलिया पहिल्यांदा संजय लीला भन्साळींच्या सेटवर भेटले होते. तेव्हा आलिया ९ वर्षांचीच होती. एवढ्या लहान मुलीला कसं माहित असणार असं म्हणत चाहत्यांनी आलियाची बाजू घेतली. तर दुसरीकडे ट्रोलर्सने आलियाला पुरेपूर ट्रोल केलं. 'रणबीरने लिपस्टिकच्या गोष्टीचा बदला घेतला','आलिया कोण आहे','आज घरी नक्कीच भांडी वाजणार' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

१३ ते १५ डिसेंबर रोजी राज कपूर यांना ट्रिब्यूट म्हणून फिल्म फेस्टिव्हल आयोजित करत असल्याचंही रणबीर म्हणाला. यामध्ये त्यांचे १० क्लासिक सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. अनेकांनी त्यांचं क्लासिक काम पाहिलं नसेल यासाठी हा फेस्टिव्हल असणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटबॉलिवूड