Join us

रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 11:00 IST

नितेश तिवारींचं दिग्दर्शन असलेल्या 'रामायण' सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सिनेमाचं पोस्टर लक्ष वेधून घेणारं आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी 'रामायण' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी रणबीर प्रचंड मेहनत घेत असल्याचंही दिसत आहे.'रामायण'मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी सिनेमाच्या सेटवरील शूटिंगदरम्यानचे काही फोटोही लीक झाले होते. या फोटोंमध्ये रणबीर आणि साई पल्लवीला राम-सीतेच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. आता 'रामायण' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

नितेश तिवारींचं दिग्दर्शन असलेल्या 'रामायण' सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सिनेमाचं पोस्टर लक्ष वेधून घेणारं आहे. 'रामायण' सिनेमाच्या पोस्टरवर बाण दाखविण्यात आला आहे. या पोस्टरमधून सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे. 'रामायण' हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. पण, यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

'रामायण' सिनेमासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, या सिनेमासाठी प्रेक्षकांना तब्बल २ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. २०२६ मध्ये रामायण सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२६च्या दिवाळीमध्ये 'रामायण : भाग १' प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर 'रामायण : भाग २' २०२७च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी रामसीताच्या भूमिकेत आहेत. तर अरूण गोविल राजा दशरथाची भूमिका साकारणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता कैकयीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात केजीएफ स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरसाई पल्लवीरामायण