Join us

पर्सनल sawaals...! रणबीर कपूरचं हिंदी ऐकून नेटकरी चक्रावले; म्हणाले, "रामायण सिनेमात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:09 IST

कपूर कुटुंबाला शुद्ध हिंदी बोलण्याचं नेटकऱ्यांनी दिलं चॅलेंज

'शोमॅन' राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त १३ ते १५ डिसेंबर खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांचे १० लोकप्रिय सिनेमे पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. याच सोहळ्यासाठी अख्खं कपूर कुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. मोदींना भेटल्यानंतर प्रत्येकाने आपापला अनुभव सांगितला. यावेळी कपूर कलाकारांचं हिंदी ऐकून नेटकरी चक्रावले. त्यातच रणबीरच्या (Ranbir Kapoor) एका व्हिडिओवरुन त्याला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

रणबीर कपूर-आलिया भट, करीना कपूर-सैफ अली खान, करिष्मा कपूर, रिद्धीमा साहनी, नीतू कपूर, रीमा जैनसह काही सदस्यांनी परवा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात छान गप्पा झाल्या.  या भेटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भेटीनंतर आलिया, करीना, रणबीर यांनी आपला अनुभव सांगितला. यावेळी रणबीर म्हणाला, "आज आम्हा कपूर कुटुंबासाठी खूप खास दिवस आहे. पंतप्रधानांनी राज कपूर यांच्या आठवणी ताज्या केल्या. वेळात वेळ काढून ते आम्हाला भेटले. यासाठी आम्ही त्यांचे आयुष्यभर आभारी आहोत. आम्ही खूप गप्पा मारल्या मजा आली. आम्ही त्यांना काही वैयक्तिक sawaals सुद्धा विचारले. खूप फ्रेंडली पद्धतीने त्यांनी आमच्याशी संवाद साधला. आमच्या सगळ्यांचीच हवा टाईट होती. आम्ही नर्वस होतो. पण त्यांनी आम्हाला कंफर्टेबल केलं. खूप धन्यवाद."

why do hindi film actors struggle so much to speak properly in hindi? byu/BeADragonQueen inBollyBlindsNGossip

रणबीरच्या या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी त्याच्या 'पर्सनल sawaals'ला लक्ष्य केलं. बॉलिवूड कलाकारांना साधी हिंदी नीट बोलता येऊ नये म्हणत टीका केली.  सध्या या व्हिडिओ रणबीर मात्र खूप ट्रोल होत आहे.  'रामायण'मधील त्याच्या कामाकडून आता आमच्या अपेक्षा कमी होत आहेत असंही नेटकरी म्हणाले. 

यासोबतच व्हिडिओमध्ये करीना, आलिया हिंदी वाक्यात जास्त इंग्रजीच शब्द बोलताना दिसत आहेत. यावरुन नेटकऱ्यांनी कपूर कुटुंबाला शुद्ध हिंदी बोलण्याचं चॅलेंजच दिलं आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरनरेंद्र मोदीबॉलिवूडहिंदी