Join us

रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:19 IST

चार मजली बंगल्याची झलक पाहिलीत का?

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) बॉलिवूडमधली लोकप्रिय जोडी. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नव्या घराचं काम सुरु आहे. बांद्रा येथे हा बंगला आहे. रणबीरने बंगल्याचं नवीन बांधकाम केलं आहे ज्याचं काम काही वर्षांपासून सुरु होतं. अनेकदा रणबीर आलिया आणि नीतू कपूर यांच्यासोबत काम कुठपर्यंत आलं ते पाहण्यासाठी जातो. आता त्यांचा हा बंगला जवळपास तयार झाला आहे. नुकतीच याची झलक समोर आली आहे.

रणबीर आणि आलियाला आपली लाडकी लेक राहा कपूरसोबत या नव्या घरात जाण्याची खूप उत्सुकता आहे. रणबीरने बंगल्याचं नाव कृष्णा राज असं  ठेवलं आहे जे त्याची दिवंगत आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावरुन आहे. हा चार मजली बंगला अतिशय आलिशान आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. बंगला जवळपास तयार झाला आहे. बंगल्याच्या प्रत्येक हिरवळ आहे. सर्वात वरच्या मजल्यावर गार्डन एरिया आहे. 

रणबीर आणि आलियाच्या या ड्रीम होमची किंमत २५० कोटी रुपये आहे. ही प्रॉपर्टी आधी राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांची होती. १९८० च्या दशकात त्यांनी ती ऋषी कपूर आणि नीतू यांना दिली. आता ती वारसा हक्काने रणबीर-आलियाकडे आली आहे. तसंच रणबीर हा बंगला लेक राहा कपूरच्या नावावर करणार आहे. लवकरच तो आलिया, राहा आणि आई नीतूसह या घरात शिफ्ट होणार आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटसुंदर गृहनियोजनमुंबई