हिंदी सिनेसृष्टीतील बहुप्रतिक्षित 'रामायण' सिनेमाचा टीझर आज रिलीज झाला. प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक समोर आला. टीझर पाहून प्रेक्षक अक्षरश: भारावून गेले आहेत. एकूणच म्युझिक, व्हीएफएक्स, दमदार सीन्स यामुळे सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण टीझरमध्ये कुठेच हनुमानाची झलक दिसली नाही. असे का हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यामागचं कारण आता समोर आलं आहे.
'रामायण' सिनेमात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आहे. यावर्षी दिवाळीत रिलीज होणाऱ्या सिनेमाच्या पहिल्या भागात सनी देओलचा फक्त १५ मिनिटांचा रोल आहे ज्याचं शूट त्याने आधीच पूर्ण केलं आहे. याचा अर्थ २०२७ मध्ये येणाऱ्या दुसऱ्या भागात सनी देओलला जास्त स्क्रीन टाईम असणार आहे. पहिल्या भागात श्रीरामाचा अयोध्येतील सुरुवातीचा काळ आणि त्यांचं शौर्य, राजा बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. यामुळेच हनुमानाची झलक टीझरमध्ये दिसलेली नाही.
‘रामायण’च्या या टीझरमधून या सिनेमातील राम या पात्राची ओळख करून देण्यात आली आहे. यामधून राम यांच्या जीवनप्रवासाची छोटी झलक दाखवण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांची झलकही यात दिसते. याशिवाय पृथ्वीचं रक्षण करणारे, महापराक्रमी, मर्यादापुरषोत्तम राम यांच्या भूमिकेत असलेला रणबीर कपूरचा पहिला लूकही पाहायला मिळत आहे. सिनेमातील काही अॅक्शन सीन्स आणि व्हीएफएक्सची झलकही पाहायला मिळत आहे.
'रामायण' हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित केला जाणार आहे. रामायण: भाग १ जागतिक स्तरावर दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होईल. तर भाग २ दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीता माता, रवी दुबे लक्ष्मण, यश रावणाच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Web Summary : The 'Ramayana' teaser reveals Ranbir Kapoor as Rama. Sunny Deol plays Hanuman, but his role is limited in the first part, focusing on Rama's early life and reign. Hanuman's full role unfolds in the second part, releasing in 2027. The film promises grand visuals and action.
Web Summary : 'रामायण' के टीज़र में रणबीर कपूर राम के रूप में दिखे। सनी देओल हनुमान बने हैं, पर पहले भाग में उनका रोल कम है, जिसमें राम के शुरुआती जीवन पर ध्यान केंद्रित किया गया है। हनुमान की पूरी भूमिका दूसरे भाग में दिखेगी, जो 2027 में रिलीज़ होगी। फिल्म में शानदार दृश्य और एक्शन का वादा किया गया है।