रणबीर कपूरचा 'रामायण' हा चित्रपट या वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली. या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या साऊथ सुपरस्टार यशने आधीच स्पष्ट केले होते की, नितेश तिवारींच्या रामायण मालिकेचा पहिला भाग ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रदर्शित होईल. आता या चित्रपटाच्या इंग्रजी व्हर्जनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'द फिथियन ग्रुप एलएलसी'चे जॉन फिथियन यांनी चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
नमित मल्होत्रा आणि यश यांनी 'सिनेमाकॉन २०२६' मध्ये रामायण जागतिक स्तरावर सादर करण्यासाठी जॉन फिथियन यांच्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. जॉन यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, अमेरिका, कॅनडा, युरोप आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख थिएटर कंपन्यांनी या चित्रपटाच्या खास प्रदर्शनात सहभाग घेतला होता. नमित मल्होत्रा यांनी पाश्चात्य सिनेमा ऑपरेटर्सना चित्रपटातील असे काही सीन्स दाखवले, ज्यात आजवर कधीही न वापरलेले विशेष तंत्रज्ञान आणि 'व्हिज्युअल इफेक्ट्स' वापरण्यात आले आहेत. हे पाहून जागतिक वितरकांनी चित्रपटाच्या भव्यतेचे कौतुक केले आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत भाष्य करताना जॉन फिथियन यांनी सांगितले की, रामायणची इंग्रजी आवृत्ती ८ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ही तारीख निर्मात्यांनी ठरवलेल्या दिवाळी २०२६ च्या मुहुर्ताशी मिळतीजुळती आहे. भारतात हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होणार असला, तरी जागतिक स्तरावर इंग्रजी भाषेतील प्रेक्षकांसाठी नोव्हेंबरच्या सुरुवातीला हा चित्रपट उपलब्ध होऊ शकतो. यामुळे भारतीय पौराणिक कथा जागतिक स्तरावर एका नव्या उंचीवर पोहोचण्यासाठी मेकर्स सज्ज आहेत.
नितेश तिवारी दिग्दर्शित या 'रामायण: भाग १' मध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूर 'प्रभू श्रीराम' यांच्या भूमिकेत, साई पल्लवी 'सीता माता', यश 'रावण', सनी देओल 'हनुमान' आणि रवी दुबे 'लक्ष्मण' यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, असा विश्वास यशने व्यक्त केला आहे.
Web Summary : Ranbir Kapoor's 'Ramayana' teaser sparked excitement. Its English version may release November 8, 2026, coinciding with Diwali. The film boasts advanced VFX and a stellar cast, including Yash as Raavan and Sai Pallavi as Sita. Global distributors praise the visuals.
Web Summary : रणबीर कपूर की 'रामायण' के टीज़र ने उत्साह बढ़ाया। इसका अंग्रेजी संस्करण 8 नवंबर, 2026 को दिवाली के साथ जारी हो सकता है। फिल्म में यश रावण और साई पल्लवी सीता के रूप में हैं। वैश्विक वितरकों ने दृश्यों की प्रशंसा की।