Join us

Ram Mandir Bhumi Pujan : जय श्रीराम! अयोध्येतील भूमिपूजनाच्या आनंदात कंगनाकडून श्रीरामाचा जयजयकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 13:44 IST

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे कंगना रानौत हिने तिचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाची वेळ आता हळूहळू जवळ येऊ लागली आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी देशात उत्साहाचे वातावरण आहे. तसेच हा आनंद सामान्य लोकांसोबतच बॉलिवूडचे सेलिब्रेटीदेखील उत्सुक आहेत. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतनेदेखील सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.

कंगनाच्या टीमने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधून त्यांनी ५०० वर्षांमधील प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सध्या कंगनाचे हे ट्विट चर्चेत आले आहे. कंगना रानौतने ट्विटमध्ये लिहिले की, आज पुन्हा एकदा राम राज्य स्थापन होणार आहे. भगवान राम केवळ एक राजाच नव्हे तर जीवन जगण्याची एक प्रेरणा, मार्ग आहेत. 

या ट्विटप्रमाणेच कंगनाने काही काळापूर्वी असेच एक ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यात तिने म्हटले की, एक असा प्रवास ज्यात प्रेम, श्रद्धा आणि भक्ती यांचा भाव आहे. सभ्यतेची एक यात्रा ज्यात भगवान श्रीराम यांची अगाध महिमेची गाथा आहे. जय श्री राम.

दरम्यान, राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाची तयारी पूर्ण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. लवकरच ते अयोध्येमध्ये पोहोचतील. आज दुपारी १२.३० वाजता हा सोहळा पार पडणार आहे, त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :कंगना राणौतअयोध्याराम मंदिर