साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट सध्या जाम चर्चेत आहे. पण या चित्रपटाची हिरोईन तमन्ना भाटिया ही चिरंजीवी यांच्यापेक्षाही अधिक चर्चेत आहे. या सिनेमातील तमन्नाच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होत आहे. केवळ पे्रक्षकच नाही तर चिरंजीवीची सूनबाई ( चिरंजीवीचा मुलगा व अभिनेता राम चरणची पत्नी उपासना कोनीडेला ) सुद्धा तमन्नाचा अभिनय पाहून भारावून गेली आहे. इतकी की, तमन्नाचा ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’मधील अभिनय पाहून तिने केवळ तमन्नाचे कौतुक केले नाही तर तिला एक खास हिरेजडीत अंगठी भेट दिली. खास यासाठी की, या अंगठीत बसवलेला हिरा जगातील सर्वात मोठ्या पाच हि-यांपैकी एक आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण या अंगठीची किंमत जवळपास दोन कोटी आहे. उपासनाने तमन्नाचा एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत याबाबत माहिती दिली.
तमन्ना भाटियाला गिफ्ट मिळाला जगातील 5 वा सर्वात मोठा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 13:36 IST
साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट सध्या जाम चर्चेत आहे. पण या चित्रपटाची हिरोईन तमन्ना भाटिया ही चिरंजीवी यांच्यापेक्षाही अधिक चर्चेत आहे.
तमन्ना भाटियाला गिफ्ट मिळाला जगातील 5 वा सर्वात मोठा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्
ठळक मुद्दे ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट सुरेन्द्र रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि चिरंजीवीचा मुलगा राम चरण याने प्रोड्यूस केला आहे.